पुण्यात पावसाचं थैमान! शहरातील 25 कुटुंबांची महापालिकेकडे मदतीची याचना

महापालिकेकडे मदतीसाठी याचना
पुण्यात पावसाचं थैमान! शहरातील 25 कुटुंबांची महापालिकेकडे मदतीची याचना
Updated on

पुणे: शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने कोंढवा, येवलेवाडी, वानवडी, हडसपर भागातील नागरिकांची अक्षरशः झोप उडवली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले, रस्त्यांची स्थितीही भयानक झाली होती. या भागातून रात्री १२ वाजेपर्यंत २५ हून अधिक कुटुंबीयांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करून मदतीची याचना केली.

रात्री साडे नऊच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. यामध्ये मध्यवर्ती पुण्यासह दक्षीण व पूर्व पुण्यात पावसाचा जोर होता. येवलेवाडी स्मशानभूमीत पाणी शिरल्याचा कॉल महापालिकेला आला, त्यानंतर कोंढवा, वानवडी, हडपसर भागातून फोन येण्यास सुरवात झाली. पहिल्या तासाभरात ९ जणांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन केले. पण त्यानंतर मात्र कक्षातील फोन कायम खणखणत होता. ज्या ठिकाणावरून तक्रारी येत होत्या, त्या लगेच क्षेत्रीय कार्यालयांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडे पाठवून मदतीसाठी त्यांना पाठवले जात होते.

पुण्यात पावसाचं थैमान! शहरातील 25 कुटुंबांची महापालिकेकडे मदतीची याचना
पुण्यात कोसळधार; ७ ठिकाणी पाणी शिरले

मध्यवर्ती भागात नागझरी नाल्याचा मोठा पूर आला, बुरूड पूल येथे पाणी पात्राच्या बाहेर आल्याने परिसरातील वस्तीमध्ये पाणी घुसले होते. तर मंगळवार पेठेतही शिवाजी आखाड्याच्या शेजारील वस्तीमध्ये पाणी घुसल्याने अग्निशामक दलाचे जवान मदतीसाठी पाठविण्यात आले.

‘‘दक्षीण पुण्याच्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने या भागाला फटका बसाल आहे. आम्ही शहरातील संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नागरिकांकडून मदत मागताच आमच्या टीम जागेवर जात आहेत’’

- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त

‘‘रात्री १२ पर्यंत २५हून अधिक फोन आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आलेले आहेत. त्या ठिकाणी आम्ही लगेच मदत पाठवली जात आहे. हडपसर, कोंढवा, येवलेवाडी, वानवडी भागात जास्त फटका बसला आहे. त्याच प्रमाणे पेठांमध्येही पाऊस जास्त झाला आहे.’’

- गणेश सोनुने, सहाय्यक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com