

Landslide Hits Mumbai-Pune Expressway During Heavy Rain
Esakal
राज्यात पावसाचा जोर वाढला असून कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड, नाशिक, पुणे सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रविवारी रात्रीपासून पुणे, मुंबई, रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलं आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे, तसंच काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाल्यानं मोठ्या रांगा लागल्या आहेत.