esakal | IMD : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

IMD : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

IMD : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात काही ठिकाणी, पुढील पाच ते सात दिवस विजांच्या कडकडाटसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा: IPL 2021, RCB vs SRH : हैदराबादचा अर्धा संघ तंबूत

अरबी समुद्रात तयार झालेल्या शाहीन वादळाचा परिणाम राज्याच्या हवामानावरही पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विशेषतः दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी होत मुसळधार पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले आहे. विजांच्या कडकडाटासह कमी कालावधीत कोसळणाऱ्या अशा अति तीव्र स्वरूपाच्या पावसामुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: रेल्वेकडून बोनसची घोषणा, १२ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

आता पुढील काही दिवस तरी राज्यात अशीच स्थिती राहील असे हवामान खात्याने कळविले आहे. रब्बीच्या हंगामासाठी १५ ऑक्टोबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस अपेक्षीत आहे. दसऱ्यानंतरही काही दिवस राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

कमी दाबाचा पट्टा

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमानच्या समुद्रात रविवार (ता.१०) पर्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आकार घेत आहे. त्यापुढील चार-पाच दिवसात त्याची तीव्रता वाढून ते ओडीसा- आंध्रप्रदेश किनारपट्टीला सरकेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळातही रूपांतर होण्याची शक्यता काही हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

loading image
go to top