महाराष्ट्रातील 'या' भागात रेड अलर्ट, 5 दिवस पावसाचा जोर वाढणार

किनारपट्टीवरील नागरिकांसह नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Maharashtra Rain Live Updates
Maharashtra Rain Live Updates
Updated on
Summary

किनारपट्टीवरील नागरिकांसह नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात राज्यभरात दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात (Mumbai Rain) जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भातील काही भागांतही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईसह कोकणातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु असून पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. (Maharashtra Rain Live Updates)

भारतीय हवामान खात्यानं ही माहिती दिली असून पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात तीव्र हवामानाचा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांसह नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील ४ ते ५ दिवस राज्यात सगळीकडे पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्रसह इतर भागातही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Live Updates
Rain Updates : मुंबईसह कोकणात मुसळधार; काही भागात रेड अलर्ट, प्रशासन सतर्क

यामध्ये हवामान खात्याने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुबंईसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि साताऱ्याला रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यांना येला अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या भागात आपत्ती व्यवस्थापन विभागसह प्रशासन सज्ज झाले आहे. या परिसरात एनडीआरएच्या तुकड्याही मागवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस, दक्षिण मराठवाड्यात काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही आज काही ठिकाणी चांगला पाऊस अपेक्षित आहे.

Maharashtra Rain Live Updates
ठरलं! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंढरपूरच्या महापूजेसाठी आमंत्रण

मुंबई आणि उपनगरांत सोमवारी सायंकाळपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह कोकणातही कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं नद्यांना पूर आला आहे. राजापूर, खेड, चिपळूण या भागांतही जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याने प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com