
वसई-विरार परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून 19 ऑगस्टलाही त्याचा जोर कायम आहे.
विरार शहरातील अनेक सखल भागात ३-४ फूट पाणी साचल्याने रस्त्यांवर नद्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.