
Heavy Rains In Maharashtra
sakal
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यावर पुन्हा एकदा आभाळ फाटले असून सहा जिल्ह्यांतील १४१ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, नगर आणि सातारा या जिल्ह्यांत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने शिवार नासले आहे. विदर्भातील वाशीम जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला.