esakal | दुष्काळी मराठवाड्यात दमदार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

rain

दुष्काळी मराठवाड्यात दमदार पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या देशातील 36 पैकी सहा हवामान उपविभागात मराठवाड्याचा समावेश झाला. तेथे सरासरीपेक्षा 23 टक्के जास्त पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

हेही वाचा: राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात 1 जून ते 5 सप्टेंबर दरम्यान सरासरी 864.1 मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी या दरम्यान 900.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत महाराष्ट्रात चार टक्के पाऊस झाला. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा हे चार हवामान उपविभाग आहेत. त्यात सर्वाधिक पाऊस मराठवाडा उपविभागात झाला. राज्यातील सर्वाधिक दुष्काळी जिल्हे असलेल्या जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस (55 टक्के) जालना जिल्ह्यात पडला.

राज्यातील सर्वांत कमी पाऊस विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पडला आहे. विदर्भ हवामान उपविभागात पावसाळ्यात आतापर्यंत 828.8 मिलिमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात 717.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत 13 टक्के कमी पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रात पावसाने सरासरी गाठली. तेथे सरासरीच्या तुलनेत पाच टक्के जास्त पाऊस पडला. राज्यात सर्वाधिक पाऊस कोसळणाऱ्या कोकणात सरासरीच्या 13 टक्के पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

हेही वाचा: 'केंद्रीय आपत्ती निवारण निधी कुणाच्या बापाचा नाही' - राजू शेट्टी

पावसाने ओढ दिलेले जिल्हे :

नंदूरबार, अमरावती, गोंदीया, चंद्रपूर

पावसाची सरासरी ओलांडलेले जिल्हे :

मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, जालना आणि औरंगाबाद

सरासरी इतका पाऊस पडलेले जिल्हे :

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, लातूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर

पावसाची सरासरी ओलांडलेले हवामान उपविभाग :

देशातील तमिळनाडू, रायलसिमा, उत्तर कर्नाटक, तेलंगण, हरियाना-छत्तीसगड-दिल्ली या बरोबर मराठवाडा.

loading image
go to top