esakal | सिरो सर्व्हेमध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रेट, बीडमध्ये सर्वांत कमी
sakal

बोलून बातमी शोधा

2Covid19_20test.

ऑगस्टच्या अखेरीस राज्यातील पाच जिल्ह्यांत दुसऱ्यांदा केलेल्या सिरो सर्व्हेत जळगाव जिल्ह्यात २५.९ टक्के बाधित असल्याचे आढळले आहे.

सिरो सर्व्हेमध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रेट, बीडमध्ये सर्वांत कमी

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण किती याचा अंदाज काढण्यासाठी आयसीएमआरने (इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) राज्यातील चार जिल्ह्यांत केलेल्या सिरो सर्व्हेमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रेट जळगाव जिल्ह्यात आढळला आहे. सर्वांत कमी बीड जिल्ह्यात आढळला आहे.

Corona Update : औरंगाबादेत नवे १७५ कोरोनाबाधित रुग्ण, बरे झाले ३३२ जण


ऑगस्टच्या अखेरीस राज्यातील पाच जिल्ह्यांत दुसऱ्यांदा केलेल्या सिरो सर्व्हेत जळगाव जिल्ह्यात २५.९ टक्के बाधित असल्याचे आढळले आहे. बीड जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे ७.४ टक्के बाधित आढळले. केंद्राचे आरोग्य सचिव तथा आयसीएमआरचे महानिदेशक पद्मश्री प्रो. डॉ. बलराम भार्गव यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना याबाबतचा अहवाल पाठविला आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण शोधण्यासाठी आयसीएमआरचे राज्यातील प्रतिनिधी डॉ. ऋषिकेश आंधळकर यांच्या पथकाने बीड जिल्ह्यात ३० ऑगस्टला हा सर्व्हे केला होता.

यापूर्वी मे महिन्यात असाच सर्व्हे झाला होता. दुसऱ्यांदा बीड, परभणी, नांदेड या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह सांगली व अहमदनगर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात सिरो सर्व्हे करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हचे प्रमाण जळगाव जिल्ह्यात आढळले. बीड जिल्ह्यात सर्वांत कमी आढळले. जळगाव जिल्ह्यात २५.९ टक्के तर बीड जिल्ह्यात ७.४ टक्के कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण आढळले.

नवरात्रापूर्वी शहरात जम्बो कोरोना चाचणी मोहीम, औरंगाबाद महापालिकेची तयारी

मे महिन्यांत सर्व्हे केला तेव्हा बीड जिल्ह्यात साधारण २० रुग्ण होते. तेव्हा चारशे लोकांच्या पाहणीत एक टक्का प्रमाण आढळले होते. यावेळी सर्व्हे केला तेव्हा बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या साडेपाच हजार होती. त्यावेळी हे प्रमाण ७.४ टक्के आढळले आहे. बीड जिल्ह्याची लोकसंख्या २९ लाखांच्या घरात आहे. यावरून पॉझिटिव्ह प्रमाणाचा अंदाज येतो.

मराठवाड्यात परभणीत सर्वाधिक
या पाहणीत मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत परभणी जिल्ह्यात पॉझिटिव्ह रेट सर्वाधिक आढळला आहे. परभणीत पॉझिटिव्हचे शेकडा प्रमाण १५.२ टक्के आहे.

जिल्हानिहाय पाहणी व पॉझिटिव्ह प्रमाण
-----
जिल्हा : सॅम्पल संख्या : पॉझिटिव्ह रुग्ण : टक्केवारी
-----
बीड :                ४४३ :      ३३ :              ७.४.
परभणी :             ४८० :     ७३ :             १५.२.
नांदेड :               ४३९ :     ४३ :               ९.८.
सांगली :             ४६७ :     ५५ :              ११.७.
अहमदनगर :        ४४७ :    ३९ :               ८.७२.
जळगाव :              ४०५ :   १०५ :             २५.९.

संपादन - गणेश पिटेकर