राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

या हवामान विभागांपैकी पावसाळ्यातील १ जून ते १९ ऑगस्ट सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. त्यामुळे तेथील पावसाची सरासरी राज्यात सर्वाधिक असते.

राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस

पुणे: राज्यातील दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस पडला. तेथे पावसाळ्याच्या पहिल्या अडीच महिन्यांमध्ये ४२५.८ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा या दरम्यान ५०४.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १८ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हे चार हवामान उपविभाग आहे. या हवामान विभागांपैकी पावसाळ्यातील १ जून ते १९ ऑगस्ट सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. त्यामुळे तेथील पावसाची सरासरी राज्यात सर्वाधिक असते.

हेही वाचा: कन्नड तालुक्यात महिनाभरानंतर दमदार पाऊस, पिकांना जीवदान

पावसाळ्याच्या या कालावधीत कोकणात मुंबईसह पाच जिल्ह्यांमध्ये सरासरी दोन हजार ३०१.४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा दोन हजार ६६९.३ मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत १६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली.

राज्यातील हवामान उपविभागांच्या सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस मराठवाड्यात पडल्याची माहिती पुढे आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे मिळून मध्य महाराष्ट्र हा हवामान उपविभाग तयार होतो.

हेही वाचा: राज्यातील 'दुष्काळी' जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस

तेथील पावसाळ्याच्या सुमारे अडीच महिन्यांमध्ये पावसाची सरासरी ५३२.६ मिलिमीटर आहे. यंदा ५७४.१ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. सरासरीच्या तुलनेत ८ टक्के जास्त पाऊस पडला आहे. विदर्भात यंदा पावसाने ओढ दिल्याचे दिसते. तेथे ६७५.४ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. या वर्षी आतापर्यंत ६१२.८ मिलिमीटर पावसाची नोंदविण्यात आला. तेथे सरासरीपेक्षा ९ टक्के पाऊस कमी पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे सांगण्यात आली.

Web Title: Highest Rainfall State Year Was Marathwada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathwada