'हिजाब गर्ल'चा महाराष्ट्रात होणार सत्कार; भाजपचा आक्रमक पवित्रा

कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खान हिचा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे
Muskan Khan
Muskan Khanटिम ई सकाळ

कर्नाटकातील हिजाब वादाने देशभरात संतापाची लाट उसळली होती. देशासह महाराष्ट्रात हिजाब प्रकरण बरंचं गाजले. आता याच हिजाब प्रकारणातील मुस्कान खान (Muskan Khan) हिचा महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) शहरात वंचित बहुजन आघाडीकडून सत्कार होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. आता यावरुन हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे.

कर्नाटकची हिजाब गर्ल मुस्कान खान हिचा 14 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. अशात वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. या विरोधात भाजपने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. हा सत्कार सोहळा होऊ नये, यासाठी भाजपने पोलीस आयुक्तांना पत्रही देण्यात आले.

Muskan Khan
एसटी कामगारांच्या संपावर तोडग्याची शक्यता; सर्वपक्षीय बैठक सुरु

मुस्कान खानचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कर्नाटकातील एका महाविद्यालयात हिजाब घालून प्रवेश करत असताना काही मुलांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. यानंतर या मुलांना प्रत्युत्तर देताना मुस्कान खानने अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या होत्या. या व्हिडीओवर अनेकांनी सोशल मिडीयावरून प्रतिक्रिया दिल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com