अररररर्र... गावांची अशीही काही गंमतीशीर नावं 

अररररर्र... गावांची अशीही काही गंमतीशीर नावं 

मुंबई - गावं म्हटलं की आपल्याला लगेच स्वतःच्या गावाचं नाव आठवत, गावातील गोष्टी आठवतात. पण अनेक अशी गावांची नावे आहेत, जी ऐकली किंवा वाचली की हसायला येतं. अशी अनेक गंमतीशीर गावांची नावे तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देशात आहेत. आपण फिरायला निघालो की गावांची नावे वाचत पुढे जात असतोच म्हणा, काहीवेळा अशी गंमतीशीर नावे देखील आपल्या वाचनात येत असतात. 

प्रत्येक छोट्यामोठ्या गावाला ज्ञात-अज्ञात इतिहास असतो. एखाद्या गावाचे नाव ऐकलं की याचा शोध घेण्यासाठी इतिहासात डोकावल्यास कित्येक  गोष्टींची उकल होते. अगदी डोंगराच्या एखाद्या लहानात लहान वाडीला देखील काही ना काही इतिहास असतोच. कित्येक गावांची नावे तर खूपच मजेशीर आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील गावांची नावे खूप विनोदी आणि गंमतीशीर आहे. त्यातीलच एक उदाहरण औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव 'कन्नड' आहे, ऐकून विनोदी वाटलं ना. कन्नड म्हणजे एक बोली भाषा आणि इथे तर एका गावाचे नावच कन्नड आहे. कन्नड भाषेचा या गावाशी काहीच संबंध नाही तरी या गावाला 'कन्नड' असे नाव पडले आहे. अशाच पध्दतीने आणखीन काही गावांची नावे आहेत.

लहानपणी सुट्टी म्हटलं की, आपण मामाच्या गावाला जाण्याच्या तयारीत असायचो. वर्षभर कामाच्या, शिक्षणाच्या आणि इतर तणावापासून दूर जाण्यासाठी गावाकडे जावून आराम करतो. गाव अनेक आहेत, अनेक गावांची अनेक नावे आहेत. गावांची नावे अनेक प्रकारची आहेत, मात्र काही गावांची नावे ही खूप गंमतीशीर आहेत. जसे की कन्नड, साखर, गुळपोळी, वांगी, भाकरी, विहीर, सावली, सापे, पावणे, ढोणे, अशी अनेक गंमतीशीर गावांची नावे आहेत. अशाच काही गंमतीदार गावांची नावे आपण जाणून घेऊयात. अशावेळी आपल्याला असे विनोदी गावांची नावे ऐकल्यानंतर असा विचार येतो ना, अशीही गावांची नावे असतात का... कसं बर या गावाला हे नाव पडले असेल... असे नाव कोणी ठेवले असेल... काय असेल त्यामागील इतिहास... ही नावे वाचली तर खूप हसायला येत आणि मनात प्रश्न ही पडतो, अशी ही गावांची नावे असू शकतात का? असे एक ना अनेक प्रश्नांचा गोंधळ आपल्या मनात सुरू असतो.

अशावेळी त्या गावाचं नाव आणि तेथील माणसे यांच्याविषयी कुतूहल नक्कीच वाढतं. ग्रामीण आणि शहरी भागातील अशी नावे असणारी गावे पाहण्याचा मोह सहजच मनाला मग्न करतो. गावाचं अस गंमतीशीर नाव कोणी ठेवलं असावं, त्या गावातील नावाचा अर्थ आणि तेथील माणसं याविषयीची ओढ मनात घर करते. प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात, देशात अनेक गावांची गंमतीशीर नावे आहेत. अनेक तालुक्यात एक आणि एकापेक्षा अनेक गंमतीशीर नाव असणारी गावे पाहायला आणि ऐकायला मिळतात. त्यासंदर्भात माहिती पाहिल्यानुसार असे अनेक गंमतीशीर-विनोदी गावांची नावे समोर आली आहेत. 

वांगी म्हणलं तर आपल्या डोळ्यासमोर येते ती वांग्याची भाजी, पण इथे गावाचे नावच 'वांगी' आहे. भारतीय सण आला की, प्रत्येक घरामध्ये बनवली जाते ती गुळपोळी, इथं गावाचे नावच 'गुळपोळी' आहे. कोपरा असा शब्द ऐकताच आपण आपल्या हाताचा कोपरा, चार भिंतीत असलेला एखादा कोपरा हा विचार करतो, परंतु इथं गावाचे नावच 'कोपरा' आहे. कोणताही गोड पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येते ती साखर, पण येथे गावाचे नावच 'साखर' आहे. गावागावात शेतात असते ती पाण्याची विहीर, पण येथे गावाचे नावच 'विहीर' आहे. तूप करायचे असल्यास वापरली जाते ती लोणी, इथे गावाचे नावच 'लोणी' आहे. उन्हाचा तडाखा जाणवायला लागला तर आपल्याला आठवते ती उपदार सावली, येथे गावाचे नावाच 'सावली' आहे. फळं म्हणले तर आपल्याला डोळ्यासमोर अनेक वेगवेगळ्या प्रकारची फळं येतात, पण इथे तर गावाचे नावच 'फळेगाव' आहे. चहा सोबत खाल्ली जाते ती खारी, पण इथं गावाचं नावाच आहे 'खारीगाव'. शहरातील गावागावांमध्ये असतो तो चौक, इथं तर गावाचे नावच 'चौक' आहे.

घरातील देवासमोर, तुळशीवृंदावनसमोर, मंदिरात लावण्यात येतो तो दिवा, येथे गावाचे नावच 'दिवा' आहे. जेव्हा आपण आपलं नवीन घर बांधतो, त्यावेळी आपण त्याला नवघर असे नाव देतो. येथे तर गावाचे नावच 'नवघर' आहे. अनेकांना हिंदी, मराठी, इंग्लिश, भक्तीगीत, लोकगीत, कोळीगीत असे अनेक गाणे ऐकायला आवडतात. येथे तर गावाचे नावच 'गाणे' आहे. दुधाला विरजण लावून बनवली जाते ती दही, येथे गावाचे नावच आहे 'दहिगाव'. प्रत्येकाच्या घरामध्ये असतो देव्हारा त्याला म्हणले जाते देवघर, इथे गावाचे नावच आहे 'देवघर'. वही- पानावर लिहिण्यासाठी वापरला जातो तो शाईचा पेन. येथे गावाचे नावच आहे 'शाई'. रस्त्याच्या आजूबाजूला घराच्या शेजारी दाट सावली देणारे अनेक झाड पाहायला मिळतात, इथे तर गावाचे नावच आहे 'झाडघर'. आहारात खाण्यात येते ती ज्वारी आणि बाजरीची भाकरी येथे तर गावाचे नावच आहे 'भाकरी'. अशी एक ना अनेक वेगवेगळ्या भागात असलेल्या गावांची नावे गंमतीशीर आहेत.

गावांची गंमतीशीर नावे...

  • सोलापूर - धोत्री, वांगी
  • बार्शी - गुळपोळी
  • लातूर - कोपरा, वरवंटी
  • पुणे - साखर, विहीर, लोणी, मांजरी 
  • अकोला - बाळापूर, कानडी 
  • अमरावती - भातकुली
  • चंद्रपुर - सावली, जिवती 
  • औरंगाबाद-  कन्नड 
  • भिवंडी - कोन, गाणे, आमणे, आवळे, कुहे, घाडणे, चाविंद्रे, चाणे, डुंगे, डोहळे, पाये, फिरंगपाडा, भोकरी, वळ, हिवाळी.
  • मुरबाड-  दहिगाव, देवघर, पोटगाव, शाई, 
  • झाडघर, एकलहरे, करचोंडे, कोंडेसाखरे, कोळोशी, खाटेघर
  • शहापूर - भाकरी
  • नांदेड- कांडली, कनकी
  • करमाळा - उंदरगाव
  • नंदुरबार - काठी, विसरवाडी, अक्कलकुवा
  • धुळे- मांजरी, दहिवेल, कापडणे, मुकटी, 
  • नाशिक- करंजी, धोडांबे, 
  • सातारा - पाचवड, बामलोणी, पिंगळी, उंडाळे, चाळकेवडी, कलचौंदी, वडूज
  • रत्नागिरी - चाफे, लांजे, मंडणगड
  • कोल्हापूर - गारगोटी
  • सांगली - विटा
  • बीड- तेलगाव, गेवराई, माजलगाव
  • अंबरनाथ - ढवळे, आंभे, उसाटणे, चामटोली, जांभळे, जांभिळघर, पादिरपाडा, पोसरी, बेंडशिळ.
  • कल्याण - फळेगाव, उतणे, कचोरे, काटई, कोसले, गेरसे, घेसर, चवरे, चिकणघर, जु, दानबाव, पितांबरे, पिसवली, बेहरे, भोपर, मोस, मोहीली, सांगोडे, सापाड, हेदुटणे.  
  • ठाणे - खारीगाव, गोडगाव, चौक, दिवा, नवघर, अडवली, करावे, कुकशेत, टेटवली, जुईगाव, दातीवली, निघू, पडले, पावणे, भूतावली, म्हाताडी.

या विषयावर बोलतांना प्रा. शंकर बोराडे म्हणाले की, व्यक्तीनाम, आडनाव आणि ग्रामनाम यांच्या कोणत्याही नामांना कोणती ना कोणती पार्श्वभूमी असते. परंतु सध्याच्या सुशिक्षित वर्गांना यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com