Hingoli Rain | हिंगोलीतील काही भागात हलका, तर कोर्टा शिवारात गारांचा पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain And Hailstorm In Hingoli

Hingoli Rain | हिंगोलीतील काही भागात हलका, तर कोर्टा शिवारात गारांचा पाऊस

हिंगोली : जिल्ह्यात बुधवार (ता.चार) दिवसभर काही भागात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेचार वाजता वसमत तालुक्यातील कोर्टा शिवारात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला. तर कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी चार ते साडेचार वाजता मेघगर्जना देखील झाली. या कालावधीत कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, जामगव्हाण, चुंचा, सुकळी आदी भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) झाला. (Hingoli Rain Updates Hailstorm In Korta, Light Showers Some Parts Of District)

वसमत तालुक्यातील गिरगाव, कुरूंदा, कोठारवाडी येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर कोर्टा व परिसरात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला. यामुळे आंबा पिकांचे या भागात नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण व उष्णता कायम होती. हिंगोली तालुक्यातील काही भागात मेघगर्जना झाली. पाच वाजता ऊन पडले होते.

जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी भागातील काही गावात सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. दरम्यान या वातावरणामुळे सध्या जिल्ह्यातील काही भागात शेतात हळद काढणीची कामे सुरू असल्याने काढलेली हळद झाकणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली होती.

टॅग्स :HingoliKalamnuriVasmat