विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचा ऐतिहासिक निर्णय! आता सर्वच अभ्यासक्रमांसाठी ‘कॅरीऑन’; PHD प्रवेशाचा मार्ग मोकळा' वाचा अजून काय...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्वच विद्याशाखेतील अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरीऑन’ची संधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यासाठी कमिटी नेमली असून त्यांचा चार दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो निर्णय लागू होणार आहे.
solapur univercity
solapur univercitysakal

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्या परिषदेने आता सर्वच विद्याशाखेतील अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरीऑन’ची संधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑर्डिनन्स कमिटी नेमली असून त्यांचा चार दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो निर्णय लागू होणार आहे. या निर्णयाने ‘सकाळ’च्या वृत्तावर आज (सोमवारी) शिक्कामोर्तब झाले.

विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात सोमवारी (ता. २५) प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे यांच्यासह विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्वच अभ्यासक्रमांच्या बैठकीत विविध विद्यार्थी आणि प्रयास संघटनेसह इतर संघटनांच्या मागणीनुसार सर्व विद्याशाखेच्या सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कॅरीऑन’ योजनेअंतर्गत (प्रथम वर्षात काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण राहिलेल्या, पण द्वितीय वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात प्रवेश मिळणार आहे) लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात नियमावली तयार करण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमली आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना ‘पीएच.डी’साठी पेट -९ ची प्रकिया सुरू करण्यापूर्वी तयार केलेल्या नियमावलीस देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता ‘पीएच.डी’ प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सिनेट सदस्य प्रा. गायकवाड यांचाही पाठपुरावा

विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना त्या प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच विधी व अभियांत्रिकीसह बीए, बी.कॉम., बीएससी, बीबीए, एमबीए, बीसीएस या अभ्यासक्रमांसाठी देखील कॅरिऑनचा निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार विद्या परिषदेच्या बैठकीत कुलगुरूंनी विविध विद्यार्थी संघटना, सिनेट व विद्या परिषदेच्या सदस्यांच्या मागणीचा विचार करून त्यासंबंधीचा निर्णय घेतला. ‘सुटा’चे पदाधिकारी प्रा. डॉ, हनुमंत आवताडे व प्रा. डॉ. तानाजी कोळेकर यांनी विद्या परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा मांडला होता.

‘त्या’ महाविद्यालयांसाठी पाच सदस्यीय समिती

शहर व जिल्ह्यामध्ये काही महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा वाढीव प्रवेश दिले आहेत. नियमानुसार दहा टक्के वाढीव प्रवेश देता येतात, पण अनेकांनी हा नियम मोडला आहे. अशा महाविद्यालयांतील साधन सामग्री, पायभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. ‘डब्ल्यूआयटी’चे प्राचार्य डॉ. विजय आठवले हे समितीचे अध्यक्ष असून प्रा. डॉ. तानाजी कोळेकर, प्रा. डॉ. हनुमंत आवताडे, डॉ. शिवशंकर मेंते, प्रा. डॉ. भीमाशंकर भांजे हे समितीचे सदस्य आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com