Ajit Pawar: वेशांतर करून दादा विमानापर्यंत पोहोचले कसे? सुरक्षा कशी भेदली? जाणून घ्या

How Ajit Pawar breached security on Airport: तत्कालीन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वेशांतर करून केलेला विमानप्रवास वादाचा विषय ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचा घेतलेला हा आढावा.
Ajit Pawar
Ajit Pawar
Updated on

मुंबई : तत्कालीन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वेशांतर करून केलेला विमानप्रवास वादाचा विषय ठरला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करत सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित विमान कंपनीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्या पार्श्वभूमीवर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचा घेतलेला हा आढावा.

सुरक्षेचे स्तर

साधारणपणे विमानतळावर प्रवाशाचा चेहरा आणि त्याचा ओळखपत्रावरील फोटो मॅच करून ओळख पटविण्यात येते. किमान दोन ठिकाणी आणि काही विमानतळांवर तीन किंवा चार ठिकाणी हे काम केले जाते.

Ajit Pawar
Ajit Pawar: आमदार अपात्रतेप्रकरणी सप्टेंबरमध्ये सुनावणी! अजित पवार, समर्थक आमदारांना नोटीस; ‘शिवसेना’ प्रकरणीही कोर्टाचे आदेश शक्य

• मोठ्या विमानतळांवर बोर्डिंग पासचेही स्कॅनिंग होते

• स्कॅनर नसलेल्या छोट्या विमानतळी खासगी रक्षक ओळख पटवितात

• श्रीनगरसारख्या संवेदनशील ठिकाणी प्रवाशांची पुन्हा तपासणी होते

बोर्डिंग पास इश्यू करताना एअरलाइन्स काउंटरवर ( जबाबदारी : विमान कंपनी)

'सिक्युरिटी होल्ड एरिया' मध्ये प्रवेश करताना ( जबाबदारी सीआयएसएफ)

विमानतळावर प्रवेश करताना डिपार्चर गेट ( जबाबदारी सीआयएसएफ)

Ajit Pawar
Eknath Shinde: मोठी बातमी! अजित पवारांशिवाय लढण्यासाठी शिंदेंचा प्लॅन रेडी? राष्ट्रवादीकडे असलेल्या 'या' आठ मतदारसंघांमध्ये निरीक्षक नेमले

अशीही शक्यता

विमानतळावर शारीरिक (फ्रिस्किंग) आणि ओळखपत्राची तपासणी होते. बोर्डिंग पास इलेक्ट्रॉनिक असेल तर थेट प्रिस्किंग आणि तपासणी होते. अजित पवार हे फ्रिस्किंग, तपासणीशिवाय इलेक्ट्रॉनिक बोर्डिंग पासवर आत गेले असावेत.

तज्ज्ञ काय म्हणतात ?

चार्टर्ड विमानाच्याबाबत वेगळे नियम असतात. या विमानाची स्वतंत्र व्यवस्था असते. तिथे खासगी वाहनातून थेट विमानापर्यंत जाता येते. अनेकदा प्रवाशाला ओळखपत्राशिवाय आणि नाव बदलून प्रवास करणे शक्य असते.

दरम्यान, पत्रकारांशी औपचारिक गप्पा करताना अजित पवार यांनी मोठा दावा केला होता. महायुती होत असताना मी ओळख लपवून दिल्लीला जायचो. त्याठिकाणी जाऊन मी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. मी तिथे जात होतो हे कोणालाही कळलं नाही, असं अजित पवार म्हणाले होते. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com