NCP Ajit Pawar : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार आणि कुठले नेते फुटले?

राज्याच्या राजकारणात दुसऱ्यांदा मोठा भूकंप झाला आहे
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात दुसऱ्यांदा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे रवाना झाले आहेत. (Latest Marathi News)

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात एकूण 54 आमदार आहेत. यापैकी एकूण 30 ते 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा देत असल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Ajit Pawar: शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट! ९ मंत्र्यांचा शपथविधी होणार तर ३० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड केली होती. ते ही अजित पवारांसोबत आहेत. सध्या प्रफुल्ल पटेल, छनग भुजबळ आणि धनंजय मुंडे हे राजभवनात असल्याची माहिती आहे. तर राजभवनात शपथविधीची तयारी सुरु आहे.(Latest Marathi News)

अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत.अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे.(Latest Marathi News)

आता राजभवनात उपस्थित नेते

अमोल मिटकरी

सुनील तटकरी

अमोल कोल्हे '

नरहरी झिरवळ

छगन भुजबळ

हसन मुश्रीफ

दिलीप वळसे पाटील

धनंजय मुंडे

अदिती तटकरे

अनिल भाईदास पाटील

बाबुराव अत्राम

संजय बनसोडे

Ajit Pawar
Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! अजित पवारांपाठोपाठ शिंदे-फडणवीस राजभवनाकडे रवाना

आज शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांची संभाव्य यादी

अजित पवार

छगन भुजबळ

दिलीप वळसे पाटील

धनंजय मुंडे

हसन मुश्रीफ

अनिल भाईदास पाटील

आदिती तटकरे

संजय बनसोडे

बाबूराव अत्राम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com