उद्या लागणार बारावीचा निकाल

भागवत पेटकर
सोमवार, 29 मे 2017

निकाल कुठे बघायचा? 
http://mahresult.nic.in/ 
www.result.mkcl.org 
www.maharashtraeducation.com  
या तीन संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. 

पुणे / नांदेड :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या 30 मे रोजी  दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.  दरम्यान, बारावीत किती टक्के गुण मिळणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्य मंडळातर्फे राज्यातील 15 लाख 5 हजार 365  विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात 8 लाख 48 हजार 929 मुलांचा तर 6 लाख 56 हजार 436 मुलींचा समावेश आहे. त्याच प्रमाणे विज्ञान शाखेच्या 5 लाख 59 हजार 423 विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या 5 लाख 9 हजार 124 विद्यार्थ्यांनी आणि वाणिज्य शाखेच्या 3 लाख 73 हजार 870 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या 62 हजार 948 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

यंदा बारावीच्या परीक्षा सुमारे दहा दिवस उशिराने सुरू झाल्या. त्याच सुरूवातीच्या काळात काही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला. मात्र, काही दिवसांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरळीत सुरू झाले. गेल्या वर्षी 25 मे रोजी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा 5 दिवस उशिराने निकाल जाहीर केला जात आहे,असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.

निकाल कसा बघाल? 

  • बोर्डाने दिलेल्या संकेतस्थळावर जा. 
  • संकेतस्थळावर १२ वीच्या रिझल्ट लिंकवर क्लिक करा. 
  • तुमचा सीट नंबर, स्कूल नंबर आणि सेंटर नंबर टाका. 
  • तुमचा निकाल बघून प्रिंटआऊट काढा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या (मंगळवार, 30 मे) जाहीर होत आहे. मंडळाने आज तशी घोषणा http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर केली आहे. मात्र, मंडळाच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर निकालासंदर्भातील सूचनेची फाईल 'एरर' दाखवत आहे. 
 

'ई सकाळ'वरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सापाने दंश केल्याने बालकाचा मृत्‍यू 
गड्यांनो, आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर
योयो परत येणार रे..!!
इंग्रजी शाळांत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश
इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प
...आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच!
दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री
मॉन्सून आणि मार्केट
आजच्या काळात तुमची खरी कसोटी : विद्यासागर राव
सैनिक तीन महिलांवर बलात्कार करू शकतात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hsc board exam result 30 May 2017

फोटो गॅलरी