'इतक्या खालच्या पातळीला जाऊन...' अजित पवारांची प्रतिक्रिया

छापेमारी करणं हा आयकर विभागाचा अधिकार आहे. मी कधीही कर चुकवेगिरी केलेली नाही.
ajit pawar
ajit pawaresakal
Updated on

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी (ajit pawar) संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आज इन्कम टॅक्सने छापेमारीची (income tax raid) कारवाई केली. त्यावर अजित पवारांनी आपली बाजू मांडली आहे. "छापेमारी करणं हा आयकर विभागाचा अधिकार आहे. मी कधीही कर चुकवेगिरी केलेली नाही" असे अजित पवार म्हणाले. "आयकर खात्याला शंका असेल, तर ते छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित काही कंपन्यांवर छापेमारी झाली. मी स्वत: राज्याचा अर्थमंत्री आहे. त्यामुळे मी माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांचा दरवर्षी नियमितपणे टॅक्स भरतो. राजकीय हेतुने इन्कम टॅक्सने छापा मारला की, त्यामागे आणखी काय हेतु होता? ते इन्कम टॅक्सचं सांगू शकते" असे अजित पवार म्हणाले.

"मी पण एक नागरिक आहे. माझ्या बहिणींची ३५-४० वर्षांपूर्वी लग्न झाली. त्या त्यांच्या घरी चांगला संसार करत आहेत. माझ्या तीन बहिणींशी संबंधित मालमत्तांवर धाडी टाकल्या. त्यामागचं कारण मला समजू शकलेलं नाही. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल, तर राज्यातील जनतेला विचार केला पाहिजे. कुठल्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातोय. याचा राज्यातील जनतेने विचार करावा" असे अजित पवार म्हणाले.

ajit pawar
LIC IPO मध्ये परदेशी गुंतवणुकीला परवानगी?

"बाकीच्या संस्थांवर धाडी टाकल्या त्यावर काही म्हणणं नाही. पण ज्यांचा काही संबंध नाही, त्यांच्यावरही छापेमारीची कारवाई झाली, त्याचंच वाईट वाटतं. इतक्या खाल्याच्या पातळीवर जाऊन कोणं कसं राजकरण करु शकतं, ते मला कळलेलं नाही" असं अजित पवार म्हणाले.

ajit pawar
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा शाळेत गोळीबार; दोन शिक्षकांचा मृत्यू

"निवडणूक काळात पवारासाहेबांचा बँकांशी संबंध नसताना ईडीची नोटीस आली. त्यातून काय राजकरण घडलं, ते सर्वांना माहित आहे" असे अजित पवार यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांनी काल जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली आणि आज कारवाई झाली. त्या प्रश्नावर 'त्याचा आणि याच मला काही संबंध वाटत नाही' असे उत्तर अजित पवारांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
aaple sarkar seva kendra
Marathi News Esakal
www.esakal.com