

IIT Bombay ChatGPT Incident news
esakal
IIT Bombay student death : आयआयटी बॉम्बेच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी संस्थेने अधिकृत खुलासा केला आहे. परीक्षेदरम्यान संबंधित विद्यार्थी मोबाईल फोन वापरताना आढळला होता. त्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या प्रकरणी विद्यार्थ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती, असे आयआयटी बॉम्बेने स्पष्ट केले आहे.