'महाराष्ट्रातील किल्ल्यांवर दर्गा, मशिदीसारखी अनधिकृत बांधकामं, ही चिंताजनक बाब' | Vinay Sahasrabuddhe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinay Sahasrabuddhe
'किल्ल्यांवर दर्गा, मशिदीसारखी अनधिकृत बांधकामं, ही चिंताजनक बाब'

'किल्ल्यांवर दर्गा, मशिदीसारखी अनधिकृत बांधकामं, ही चिंताजनक बाब'

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे (Vinay sahasrabuddhe) यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील रायगडसहीत (Raigad) अन्य किल्ल्यांवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात केन्द्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडावर तसेच विशालगड, चंदनगड, लोहगड आणि कुलाबा या किल्ल्यांवर दर्गा आणि मशिदीसारखी प्रार्थनास्थळांचं अनधिकृत बांधकाम सुरू आहे. याबाबत विनय सहस्त्रबुध्दे यांनी केन्द्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री यांना निवेदन दिले. अर्जुन राम मेघवाल यांनी हे निवेदन स्वीकारले असून भारतीय पुरातत्व विभागाला (Archaeological Survey of India) त्यासंबधीत निेर्देश दिले असल्याची माहिती विनय सहस्त्रबुध्दे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली.

हेही वाचा: राज्यावर ड्रोन हल्ल्याचं सावट; अँटी ड्रोन सिस्टीम नसल्यानं चिंता

विनय सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले, "या किल्ल्यांवर नेहमी जाणारे गिर्यारोहक आणि शिवप्रेमींनी अनधिकृत बांधकामाची बाब नजरेस आणून दिली. काही किल्ल्यांवर भिंतीला पांढरा देऊन तिथे दर्गा, मशिद किंवा तत्सम प्रकाराचे बांधकाम सुरू करण्याच्या हालचाली आहे. एका ठिकाणी राजकीय पक्षाच्या मदतीने ऊरूस भरवला जात आहे. शिवप्रभूंच्या या किल्ल्यांची जी पवित्रता आहे, त्या संदर्भात चिंता उत्पन्न करणारी ही बाब आहे."

हेही वाचा: शिवसेनेतील ९० टक्के आमदार नाराज, भाजप नेत्याचा दावा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bjp
loading image
go to top