

Maharashtra Weather
ESakal
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक विभागात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. तर काही भागात ढगाळ वातावरणासह तुरळक पाऊस पडत आहे. मान्सूनचा जोर अद्यापही कायम असून हवामान विभागाने येत्या तीन दिवसांत पावसाचे हे वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.