Vidhan Sabha 2019 : 'या' आहेत महाराष्ट्रातील लक्षवेधी लढती

Vidhan-Bhavan
Vidhan-Bhavan

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य 21 ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्‍चिममधून लढवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध कॉंग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. तसेच, बारामती आणि पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून सांगलीत लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने अजित पवार यांच्या विरोधात उतरवले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून उभे आहेत. तेथे मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापल्यामुळे मतदारसंघात नाराजी आहे. यावर पाटील यांनी समन्वयाचा मार्ग काढला असला, तरी मनसेच्या किशोर शिंदे यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिल्याने येथे "कॉंटे की टक्‍कर' होणार आहे.

लक्षवेधी लढती-
1) वरळी : आदित्य ठाकरे (शिवसेना) विरुद्ध सुरेश माने (आघाडी)
2) बारामती : अजित पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध गोपीचंद पडळकर (भाजप)
3) कोथरूड : चंद्रकांत पाटील (भाजप) विरुद्ध किशोर शिंदे (मनसे)
4) दक्षिण कराड : पृथ्वीराज चव्हाण (कॉंग्रेस) विरुद्ध अतुल भोसले (भाजप)
5) परळी : पंकजा मुंडे (भाजप) विरुद्ध धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
6) येवला : छगन भुजबळ (राष्ट्रवादी) विरुद्ध संभाजी पवार (शिवसेना)
7) शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश थोरात (कॉंग्रेस)
8) नालासोपारा : प्रदीप शर्मा (शिवसेना) विरुद्ध क्षितिज ठाकूर (बविआ)
9) बीड : जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) विरुद्ध संदीप क्षीरसागर(राष्ट्रवादी)
10) कर्जत जामखेड : राम शिंदे (भाजप) विरुद्ध रोहित पवार (राष्ट्रवादी)
11) इंदापूर : दत्ता भरणे (राष्ट्रवादी) विरुद्ध हर्षवर्धन पाटील (भाजप)
12)देवेंद्र फडणवीस (भाजप) विरुद्ध आशिष देशमुख (काँग्रेस)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com