Kasba Peth Bypoll Election : पोटनिवडणुकीत ठाकरे गटाची उडी; 'चिंचवड'वर केलाय दावा, आता...

Kasba Peth Bypoll Election
Kasba Peth Bypoll Election

पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूकीवरुन राजकीय पक्षात चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊ देऊ नये. ती निवडणूक महाविकास आघाडीच्यावतीने लढविण्यात यावी, असा आग्रह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे कार्यकर्ते करू लागले आहेत.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार व जयंत पाटील यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

हेही वाचा - 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विरोधकांनी परंपरा जपावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीचा दाखला दिला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

Kasba Peth Bypoll Election
Ahmednagar Murder Mystry: आत्महत्या नाही तर घातपात ! तीन चिमूरड्यांसह ७ जणांच्या मृत्यूमागे करणी ?

मुख्यमंत्र्यांचे बरोबर आहे. परंपरा आहे, पण अंधेरीची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली नाही. भाजपने निवडणूक लढली नाही. मात्र नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही ठीकाणी निवडणुका झाल्या. या दोन्ही मतदार संघात आमदारांच्या जवळचे नातेवाईक उभे होते तरी त्या निवडणुका झाल्या. अंधेरीची पोटनिवडणूक हा अपवाद होता. ती निवडणूक मुंबईत होती आणि भाजपला ती निवडणूक जिंकण्याची अजिबात संधी नव्हती, असे संजय राऊत म्हणाले. 

Kasba Peth Bypoll Election
Raj Thackrey : मनसेच्या सभांनाही गर्दी होते पण मतं मिळत नाहीत, राज ठाकरे म्हणाले...

संजय राऊत म्हणाले, "काल रात्री अजित पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे हे काल मातोश्रीवर आले होते. कसबा आणि चिंचवड निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. परत याबबात चर्चा होईल. पण निवडणूक लढली तर चिंचवडच्या जागेवर ती शिवसेनेने लढावी, असे आमच्या सर्वांचे मत आहे. कसब्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात निर्णय होईल. पण लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रीक्त झालेली आहे तिथे शिवसेना लढेल, अशा प्रकारची चर्चा आमची झाली." 

Kasba Peth Bypoll Election
National Tourism Day 2023: कोकणात जातच आहात तर यंदाच्या गणेश जयंतीला पेशवेकालीन अती प्राचीन मंदिराला भेट द्या!

मुख्यमंत्री म्हणतात संस्कृती जपावी पण पंढरपूर आणि नांदेड मध्ये ही संस्कृती दिसली नाही. अंधेरीत दिसली त्याला वेगळी कारणे होती. कसबा-चिंचवडमध्ये आम्ही लढलो नाही तरी त्या निवडणुका होतील. 

Kasba Peth Bypoll Election
IND vs AUS Test: न्यूझीलंडला हरवल्यानंतर बुमराहबाबत कर्णधार रोहितचा मोठा खुलासा; म्हणाला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com