
सोलापूर : दहावीच्या निकालानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून २० मेपासून https://poly25.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. १६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. तर अभियांत्रिकी प्रवेशाला १५ जूननंतर सुरवात होणार असून, विद्यार्थ्यांचा सीईटीचा निकाल १५ जूनपूर्वी जाहीर होणार आहे.
पॉलिटेक्निकसाठी (तंत्रनिकेतन) प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार किंवा अडचण असल्यास तंत्र शिक्षण संचालनालयाकडून ७६६९१००२५७/१८००३१३२१६४ हा मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत त्यावर विद्यार्थ्यांना संपर्क साधता येणार आहे. जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनची प्रवेश क्षमता ५७० असून अन्य २३ खासगी तंत्रनिकेतनची क्षमता पाच हजार ५२६ इतकी आहे.
दरम्यान, ५ मे रोजी पार पडलेल्या सीईटी परीक्षेची उत्तरतालिका ऑनलाइन प्रसिद्ध झाली आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या हरकती, आक्षेप नोंदवले जात आहेत. सध्या ‘पीसीबी’च्या विद्यार्थ्यांचे आक्षेप नोंदवून घेतले असून, त्यावर सध्या कार्यवाही सुरू आहे. आता उद्यापासून (ता. २२) २५ मेपर्यंत ‘पीसीएम’ ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्या हरकती नोंदविण्यात येणार आहेत. त्याची पडताळणी आठ दिवसांत होईल. त्यानंतर १० ते १५ जून दरम्यान अंतिम निकाल प्रसिद्ध होईल. १५ जूनपासून अभियांत्रिकीच्या प्रवेशाला सुरवात होणार आहे. १५ ऑगस्टपासून अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू होणार आहेत.
प्रवेशासाठी लागणारी प्रमुख कागदपत्रे
जात प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्यांना जातीचा दाखला
एससी, एसटी वगळता सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंत व्हॅलिड नॉन क्रिमीलेअर
शाळा सोडल्याचा दाखला (भारतीय नमूद असावे) अन्यथा, डोमिसाईल लागते
तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी शुल्क असे...
१) खुला प्रवर्ग (८ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना)
शासनाचे शुल्क १७५० रुपये आणि ट्यूशन फी सहा हजार रुपये
-------------
२) ईबीसी व ओबीसी प्रवर्ग
शासनाचे शुल्क १७५० रुपये आणि ट्यूशन फी ३००० रुपये
-----------
३) एससी, एसटी, एनटी प्रवर्ग
या विद्यार्थ्यांची संपूर्ण ट्यूशन फी शासन भरते. त्यांना फक्त १७५० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागते
तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया अशी...
ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या छायांकित प्रती अपलोड करणे : २० मे ते १६ जून
प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती : २० मे ते १६ जून
तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित : १८ जून
तात्पुरत्या गुणवत्ता यादीसंदर्भात हरकत सादर करणे : १९ ते २१ जून
अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : २३ जून
पसंतीक्रम भरून प्रवेश निश्चित करणे : २३ ते ३० जूनपर्यंत
सोलापूर जिल्ह्यातील एकूण प्रवेश क्षमता
तंत्रनिकेतन : २४
एकूण प्रवेश क्षमता : ६,०९६
------------
अभियांत्रिकी महाविद्यालये : १५
एकूण प्रवेश क्षमता : ७,१००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.