नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा, तर राज यांच्यावर का नाही? : इम्तियाज जलील | Imtiaz Jaleel Comment On Raj Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray And Imtiaz Jaleel

''राणांवर राजद्रोहाचा गुन्हा, तर राज यांच्यावर का नाही?''

औरंगाबाद : नवनीत राणा यांच्याविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण यांच्यावर काय ? हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांना दंगे करण्यास उद्युक्त केले. समाजात तेढ निर्माण करतात, असा घणाघाती टीका खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केली आहे. आज मंगळवारी (ता.तीन) औरंगाबाद (Aurangabad) येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जलील बोलत होते. पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली. तुम्ही तीन तारखेला ईदच्या दिवशी हनुमान चालीसा म्हणण्यास उद्युक्त केले. मुस्लिम बांधवांनी पोलिसांवर विश्वास ठेवावे. (Imtiaz Jaleel Ask Why Not Sedition Case File Against Raj Thackeray In Aurangabad)

हेही वाचा: ...त्यांना लांबूनच ईदच्या शुभेच्छा ! इम्तियाज जलील यांची राज ठाकरेंवर टीका

आता बाजारपेठांमध्ये लोक जास्त आहेत. रमजान आहे. तुम्ही नंतर सभा घ्या, असे सरकारने का सांगितले नाही, असा सवाल इम्तियाज जलील यांनी ठाकरे यांच्या सभेवरुन महाराष्ट्र सरकारला केला आहे. मुख्यमंत्र्यांना वाटतं की माझा भाऊ आहे. त्यामुळे राजद्रोहाचे कलम लावले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अस वाटत की पुढे आपल्याला मनसेबरोबर जावे लागेल. त्यामुळे कलमे कमी लावले आहेत. दुसऱ्या कोणावर जे कलमे लावली गेली असती तसेच त्यांच्यावर लावावेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा: साॅरी भावांनो ! व्हाॅट्सअपवर स्टेट्स ठेवून तरुणाने केली आत्महत्या

आपण स्टेजवर गेल्यावर तोंडात बोळे कोंबा, हाणा, असे म्हणणाऱ्यांसाठी वेगळ आणि माझ्यासाठी वेगळे कलम. पण सर्वांसाठी कायदे समान आहेत. गुन्हा जामीन योग्य आहे. राज्य व देशापेक्षा कोणीही महत्त्वाचे नाहीत, असे इम्तियाज जलील म्हणाले.

Web Title: Imtiaz Jaleel Ask Why Not Sedition Case File Against Raj Thackeray In Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top