औरंगजेबाला आम्ही आदर्श मानतच नाही, जलील यांच राऊतांना उत्तर

Jaleel- Raut
Jaleel- RautTeam esakal

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे. आम्ही तुमच्यासारखे नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर करत नाही. आम्ही तुमच्यापेक्षा अधिक त्यांचा आदर करतो.

औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दांचा मारा करत इम्तियाज जलील यांनी राऊतांवर शाब्दिक हल्ला केला. मुस्लीम समाज केवळ अल्लाह समोर नतमस्तक होतो. औरंगजेबच्या कबरीवर आम्ही जात नाही. औरंगजेब आमचा आदर्श आहे असे आम्ही कधीच म्हटलेलो नाही, असेही ते म्हणाले.

Jaleel- Raut
"तुम्ही आघाडीचा प्रस्ताव द्या, मी हिंदुत्वाच्या नावाने बोंब मारतो"

काय म्हणाले होते राऊत

एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही गोष्ट पाहायला मिळाली. बंगालमध्येही हेच चित्र दिसले, असे म्हणत संजय राऊत यांनी एमआयएम पक्षावर आरोप केला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मानणारे पक्ष आहेत. परंतु, एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरी पुढे जाऊन गुडघे टेकतात ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. ते शिवसेनेचा आदर्श होऊ शकत नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

Jaleel- Raut
'काश्मीर फाईल्स'च्या वादात संजय राऊतांची उडी; काढली 'बेळगाव फाईल्स'

एमआयएमचे खासदार आणि प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी राज्यातील महाविकास आघाडीला (MVA) दिलेल्या एका खुल्या प्रस्तावामुळे राजकीय चर्चांना उधान आलं आहे. जलील यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे जलील यांनी हा निरोप दिला. तुम्ही नेहमीच आमच्यावर भाजपची टीम बी असल्याचा आरोप करतात. मात्र आम्ही भाजपला हरवण्यासाठी तुमच्यासोबत येण्यास तयार आहोत. अशी ऑफर जलील यांनी दिली. त्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विशेषत: शिवसेनेची यावरून चांगलीच गोची झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com