Sanjay Raut vs Sanjay Shirsat: एकेरी टीका करणारे शिरसाट खासदार संजय राऊतांसमोर येतात तेव्हा...

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट समोरासमोर आल्याचे दिसून आले
Shivsena
ShivsenaEsakal

शिवसेनेत बंड झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते ठाकरे गटातील नेत्यांवर वारंवार टीका करत असतात. शिंवसेनेच्या दोन्ही गटाकडून एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. मात्र, आता सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. आठ वर्षांनंतर मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात होत आहे. संपुर्ण मंत्रीमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट समोरासमोर आल्याचे दिसून आले आहे.

Shivsena
Mumbai High Court : 'वेडी आहेस' म्हणणं अपमान नाही, हायकोर्टाची टिप्पणी; घटस्फोट प्रकरणात पत्नीला दिली समज

छत्रपती संभाजीनगर शहरातील ॲम्बेसेडर हॅाटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संजय राऊत आणि संजय शिरसाट आमने-सामने आल्याचं दिसून आलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवून न जाता हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस देखील केली. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

Shivsena
Sambhaji Nagar Cabinet Meeting: सीईओंच्या दालनात बसणार मुख्यमंत्री ; प्रशासनाने घेतला ताबा

दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट कायमच ठाकरे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसून येतात. त्यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जोरदार प्रत्युत्तर देत असतात. मात्र जेव्हा हे दोन्ही नेते शुक्रवारी एकमेकांसमोर आले तेव्हा त्यांनी हस्तांदोलन करत ऐकमेकांची विचारपूस केली. याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Shivsena
Jammu Kashmir: अनंतनागनंतर आता बारामुल्लामध्येही चकमक; सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, एक दहशतवादी ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com