शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 March 2020

रस्त्यांचे काम प्रगतिपथावर
ग्रामविकास विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना सुरू रहावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यात सध्या १६ हजार ७०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम प्रगतिपथावर असून १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले आहेत. तसेच, पंचायत समित्यांना आर्थिक अधिकार देण्याचा प्रयत्न आहे.

मुंबई - राज्यशासन शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार असून, लवकरच राज्यात एक लाख थाळ्या दररोज देण्याचा कार्यक्रम आखला असून, तालुकास्तरापर्यंत याची व्याप्ती वाढविण्याचे विचाराधीन असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, सहकार, वस्त्रोद्योग या विभागांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना भुजबळ बोलत होते.

पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय : धनंजय मुंडे

भुजबळ म्हणाले, की शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविण्याची मागणी केली जात आहे, त्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवभोजन ही प्रायोगिक तत्त्वावरील योजना असून टप्प्याटप्प्याने तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भोजन केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असून, थाळींची संख्यादेखील वाढवली आहे.

आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase the scope of Shiv Bhoj Yojana chhagan bhujbal