

Maharashtra Census
ESakal
Census Schedule Maharashtra : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल. स्व-गणना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत केली जाईल. हा देशव्यापी जनगणना कार्यक्रम १६ एप्रिल २०२६ रोजी सुरू होईल आणि ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. ही जनगणना प्रथमच डिजिटल पद्धतीने केली जात असून, प्रथमच स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.