

Online census data collection via mobile application
esakal
Digital Census India : देशातील जनगणना २०२७ मध्ये होणार असली, तरी त्याची पूर्वतयारी जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. याचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून या कालावधीत होणार आहे. त्या आधी नागरिकांना ॲपद्वारे स्वतःची आणि कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. त्यानंतर प्रगणक घरी येऊन माहितीची खातरजमा करतील. याशिवाय जिल्ह्यातील सर्व भागात जनगणनेचे ब्लॉक केले जातील. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती होऊन प्रत्यक्ष जनगणना केली जाईल. यावेळी प्रथमच जातनिहाय जनगणनाही केली जाणार आहे.