

Indian Railway Ticket Cancellation Rules
ESakal
मुंबई : भारतीय रेल्वेने रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. अद्ययावत नियम अधिक कडक झाले असून, शेवटच्या क्षणी तिकीट रद्द केल्यास त्याचा कोणताही परतावा प्रवाशांना मिळणार नाही. दुसरीकडे, लवकर तिकीट रद्द केल्यास कमी शुल्क आकारण्यात येईल. या बदलांचा उद्देश तिकीट उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढविणे आणि बुकिंगचा गैरवापर रोखणे हा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांसाठी व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल, असा दावा भारतीय रेल्वेने केला आहे.