esakal | महाराष्ट्रात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे संकेत; कोणाची लागणार वर्णी
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

राजस्थानातील घडामोडींना पूर्णविराम मिळताच कॉँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होतील असे संकेत असून महाराष्ट्राला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल असे मानले जाते. येत्या दोन वर्षात काँग्रेसची घडी उत्तम व्हावी यासाठी प्रभावी नेत्याचा शोध सुरू आहे. विस्तारासाठी संधी असलेल्या विदर्भातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असावा असे कोष्टक मांडले जात असून नाना पटोले किंवा डॉ. नितीन राऊत यांचे नाव या पदासाठी समोर आले आहे.

महाराष्ट्रात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे संकेत; कोणाची लागणार वर्णी

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - राजस्थानातील घडामोडींना पूर्णविराम मिळताच कॉँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होतील असे संकेत असून महाराष्ट्राला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल असे मानले जाते. येत्या दोन वर्षात काँग्रेसची घडी उत्तम व्हावी यासाठी प्रभावी नेत्याचा शोध सुरू आहे. विस्तारासाठी संधी असलेल्या विदर्भातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असावा असे कोष्टक मांडले जात असून नाना पटोले किंवा डॉ. नितीन राऊत यांचे नाव या पदासाठी समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे नाना पटोले हे ओबीसी समाजातले महत्त्वाचे नेते आहेत. राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांना इच्छा असून ते नुकतेच दिल्लीला, ‘संधी द्या’ ही विनंती करून आले आहेत. शेतकरी समाजातील पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. ते राहुल गांधी यांच्या जवळचे आहेत. मात्र भाजपत जाऊन आलेले हा त्यांच्या विरोधात जाणारा मुद्दा आहे.

वीरप्पनच्या मुलीचे समाजसेवेचे स्वप्न

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचाही प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार होतो आहे. ते दलित आघाडीचे काम राष्ट्रीय स्तरावर सांभाळतात. त्यामुळे तेही राहुल गांधी यांच्या जवळचे आहेत. ऊर्जा खाते सांभाळताना त्यांनी आक्रमकपणे दिवे लावण्याच्या मोहिमेला लक्ष्य करत भाजपला आव्हान दिले होते.

पश्चिम बंगालमध्ये मुलीचा सापडला मृतदेह; जमावाचा उद्रेक, वाहनांची जाळपोळ

राजस्थानचे प्रभारी असणाऱ्या अविनाश पांडे यांचाही प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार होईल असे मानणारा एक वर्ग आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे सोनिया गांधी यांनी ऑगस्ट २०२० पर्यंत स्वीकारली होती. त्यांची जागा पुन्हा राहुल घेतील असे चित्र असल्याने त्यानंतर लगेच महाराष्ट्रात बदल होतील असे मानले जाते.

पृथ्वीराजबाबांकडे जबाबदारी?
महाराष्ट्रात पक्ष बळकट व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही सक्रिय केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

Edited By - Prashant Patil