Gautami Patil: गौतमी पाटीलवरील टीकेनंतर इंदुरीकर महाराजांना प्रसार माध्यम अन् सोशल मीडियाची धास्ती

नांदेड मध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदूरीकर महाराजांनी कार्यक्रमात सुरू केला नियम
Gautami Patil
Gautami PatilEsakal

गौतमी पाटील वरील टीकेनंतर इंदुरीकर महाराजांनी आता प्रसार माध्यमांची आणि सोशल मीडियाची धास्ती घेतल्याचं दिसुन येत आहे. नांदेड मध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदूरीकर महाराजांनी कार्यक्रमात चित्रीकरण करणारे कॅमेरे आणि मोबाईलवर बंदी घातली. (Latest Marathi News)

आपल्या कार्यक्रमातील शब्द कुठल्याही कॅमेरात किंवा मोबाईलमध्ये टिपले जाऊ नयेत यासाठी इंदूरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कॅमेरे आणि मोबाईल (Mobile) वापरावर बंदी घातली त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात केल्याचं दिसून आलं.

इंदुरीकर महाराज कीर्तन करताना आपल्या शैलीतून अनेकांचा समाचार घेत असतात. सध्या गौतमी पाटील हिने आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात धुडगूस घातला आहे. इंदूरीकर महाराजांनी देखील एका कार्यक्रमात गौतमी पाटीलचा समाचार घेत तिला लक्ष केलं होत.

Gautami Patil
Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणींत मोठी वाढ! खुद्द हायकोर्ट म्हणतय, 'मंत्रिपदाचा दुरुपयोग...'

गौतमी पाटील ही एका गाण्यासाठी तीन लाख रुपय घेते असे वक्तव्य इंदूरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला होता. महिला संघटनांनी या वक्तव्याचा निषेध करत इंदुरीकर महाराज महिला विरोधी असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती.

Gautami Patil
Traffic Jam : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे'वर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या दीड किमीपर्यंत रांगा

या प्रकारानंतर इंदुरीकर महाराज यांनी सावध भूमिका घेतली आहे. आपल्या कीर्तनातून बाहेर काही जाऊ नये म्हणून नांदेड (Nanded) येथील कार्यक्रमात मोबाईल आणि चित्रीकरण करणारे कॅमेरे हटवले आणि त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

Gautami Patil
Mumbai : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला कल्याणात मोठा धक्का…

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com