
Sameer Wankhede And Shah Rukh Khan
ESakal
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात कायमस्वरूपी आणि अनिवार्य मनाई आदेश, घोषणापत्र आणि नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. हा खटला अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांची कंपनी, रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतर पक्षांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता अभिनेता शाहरुख खानच्या अडचणीत वाढल्या आहेत.