Anil Deshmukh: 'त्यांनीच जीआर काढला अन् त्यांनीच रद्द केला...', माजी गृहमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार

"त्यांचं पाप आमच्या माथी नको"; फडणवीसांनी मांडला कंत्राटी भरतीचा लेखाजोखा, उबाठा सरकारचे जीआर केले रद्द
Anil Deshmukh
Anil DeshmukhEsakal

राज्यातील कंत्राटी भरतीवरुन सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. यासाठी महाविकास आघाडीनं आंदोलनही सुरु केलं आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यांसह हल्लाबोल केला. तसेच या सरकारनं जे कंत्राटी भरतीचा जीआर काढले ते रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. फडवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं आहे.

यावेळी बोलताना देशमुख यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा धिक्कार करत, फडणवीसांना लक्ष केलं आहे. राज्यात अनेक युवक पोलिस भरतीची प्रतीक्षा करत आहेत. आमचा कधी पोलिस भरतीत नंबर लागेल, फडणवीस सरकारने आधी सांगितलं पाहिजे त्यांनी सुरक्षा रकक्षकांना पोलिस भरतीत समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतला तो रद्द करणार का? राज्यातील युवकांना न्याय देणार का? असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला आहे.

Anil Deshmukh
Contractual Recruitment: "त्यांचं पाप आमच्या माथी नको"; फडणवीसांनी मांडला कंत्राटी भरतीचा लेखाजोखा, उबाठा सरकारचे जीआर केले रद्द

दरम्यान पुढे बोलताना म्हणाले की, प्रशिक्षण देण्याची क्षमता मला माहिती आहे. राज्यात अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे आहेत. आत्तापर्यंत भरती प्रक्रिया पुर्ण व्हायला हवी होती. सुरक्षा मंडळ सरकारचे आहे, मात्र, सुरक्षा मंडळ हे सिक्युरिटी गार्ड पुरवठा करते त्या सुरक्षा महामंडळाचे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना तुम्ही पोलिसमध्ये भरती करत आहेत त्याला माझा माजी गृहमंत्री म्हणून आक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Anil Deshmukh
Devendra Fadnavis : उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आता माफी मागणार का? कंत्राट भरतीवरून फडणवीसांचा थेट सवाल

राज्यातील युवकांना भरती करा, त्याचबरोबर त्यांनी जे जीआर रद्द केले त्यावर देशमुख म्हणाले की, आम्ही ज्या जीआरला आक्षेप आहे. तो जीआर ६ सप्टेंबर २०२३ चा जीआर कोणी काढला. याच सरकारने काढला. ६ सप्टेंबर २०२३ ला काढलेला जीआर रद्द करा अशी आमची मागणी होती, त्यांनीच जीआर काढला आणि आज त्यांनीच जीआर रद्द केला. राज्यातून युवकांचं प्रेशर आल्यामुळे हा जीआर रद्द केला असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com