Jalna News : गावाला पुराचा वेढा, रस्ते बंद, आजारी नातवाने उपचाराअभावी आजीच्या खांद्यावरच सोडले प्राण; हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ

Jalna Flood : अंबड तालुक्यातील रुई तांड्यावर ही हृदयद्रावक घटना घडली. गावाला पुराचा वेढा पडला आणि रस्ते बंद झाले. अशातच आजारी प्रथमेशला दवाखान्यात नेता आले नाही. उपचाराअभावी त्याचा जीव गेला.
Heartbreaking Jalna flood tragedy as 3-year-old dies due to lack of treatment; Marathwada floods, Maharashtra heavy rain impact villages.

Heartbreaking Jalna flood tragedy as 3-year-old dies due to lack of treatment; Marathwada floods, Maharashtra heavy rain impact villages.

esakal

Updated on

Summary

  1. जालना जिल्ह्यातील रुई तांड्यावर उपचाराअभावी ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

  2. मुसळधार पावसामुळे गाव पुराने वेढले गेले असून रस्ते व पूल वाहतुकीसाठी बंद आहेत.

  3. परतीच्या पावसाने मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान होऊन लाखो लोकांचा संपर्क तुटला आहे.

मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आले. दरम्यान अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याने नागरिकांचे हाल सुरु आहेत. अशातच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आजारी मुलाला वेळेवर दवाखान्यात नेता न आल्यामुळे उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला आहे.

Heartbreaking Jalna flood tragedy as 3-year-old dies due to lack of treatment; Marathwada floods, Maharashtra heavy rain impact villages.
Mohol Rain Update: 'सीना नदीला आलेल्या पुरामुळे मोहोळ तालुक्यातील तीस कुटुंबांचे स्थलांतर'; पाच बंधारे पाण्याखाली
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com