Rain Gauge Tampering Exposed at Weather Centres
esakal
जालना जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये उघड झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. पाऊस झाला नसतानाही यंत्रांमध्ये पावसाची नोंद दाखवण्यासाठी पर्जन्यमापकांशी छेडछाड करण्यात आल्याचे प्रशासनाच्या तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ४९ केंद्रांपैकी तब्बल ४० केंद्रांमध्ये हा प्रकार एक-दोन नव्हे, तर चार वेळा घडल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे.