esakal | राष्ट्रवादी काँग्रेसकडून फक्त 'हे' दोनच मंत्री घेणार शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

NCp

उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळाले असले तरी या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. अजित पवार की जयंत पाटील असे चर्चा सुरु आहे. मात्र, आज सायंकाळी उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोघेच शपथ घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून फक्त 'हे' दोनच मंत्री घेणार शपथ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसकडून फक्त जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोनच नेते मंत्रिपदाची शपथ घेणार हे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. अजित पवार हे आज शपथ घेणार नाहीत, असे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मंत्रिपदांच्या वाटपाचेही सूत्र ठरले असून, त्यानुसार उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला, तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात येणार आहे. शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय, देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलाविण्यात आले आहे.

अजित पवारांच्या नाराजीची पुन्हा अफवा; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळाले असले तरी या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. अजित पवार की जयंत पाटील असे चर्चा सुरु आहे. मात्र, आज सायंकाळी उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोघेच शपथ घेणार आहेत. तर, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले हे शपथ घेतील. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे नाव निश्चित आहे. 

राज्यात आजपासून उद्धव सरकार 

loading image
go to top