Jayant Patil l सुजय विखेंवर टीका करताना जयंत पाटलांची जीभ घसरली; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil vs Sujay Vikhe Patil

सुजय विखेंवर टीका करताना जयंत पाटलांची जीभ घसरली; म्हणाले...

भाजप खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe-Patil) महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका करताना पातळी सोडली होती. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना नवरा-बायकोची उपमा देत त्यांनी टिका केली होती. त्यावरून जयंत पाटलांनी (Jayant Patil) आज आक्षेपार्ह शब्द वापरला आहे. चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

हेही वाचा: Hijab Row l बेळगावात दहावीच्या पहिल्या पेपरला 430 विद्यार्थ्यांची दांडी

यावेळी जयंत पाटील म्हणाले, नवरा, बायको,पाहुणे अशा बिरुदावल्या आमच्यातल्या सगळ्यांना देणाऱ्या षंढांबाबत काहीही बोलण्याची गरज नाही. कारण,षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात, अशा जळजळीत शब्दात जयंत पाटील यांनी टीका केला. पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीचे आमदार फुटत नाहीत अस भाजपाच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ते प्रचंड चिडून टोकाला गेले आहेत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांवर आणि मविआच्या काही मंत्र्यांवर राग काढला जात आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून साम-दाम-दंड, भेद या सगळ्याचा वापर केला जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा: "बस्स झाले टोमणे, आता कामं करा"; CM उद्धव ठाकरेंना भाजपाचा टोला

सुजय विखे-पाटील नेमकं काय म्हणाले?

महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचे आहे. राष्ट्रवादी (NCP) नवऱ्याच्या भूमिकेत तर शिवसेना (Shiv Sena) मूक बायकोच्या भूमिकेत असून काँग्रेस (Congress Party) ही बिनबुलाये वऱ्हाडी असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यांना कितीही बोलले तरी ते जेवणाचा ताट सोडत नाहीत असे ते म्हणाले.

Web Title: Jayant Patil Criticism Sujay Vikhe Patil Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..