
राष्ट्रपती राजवट लावायची असल्यास केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करू नये - जयंत पाटील
'ठाकरेंना हिंदुत्त्व शिकवायला त्यांच्याच दारात जात असाल तर...'
सध्या राज्याच्या राजकारणात अराजकता माजली आहे. काहीच करता येत नसल्याने भाजप त्यांच्याच आमदार आणि खासदारांना काही गोष्टी करायला लावत आहेत. स्वत:च अराजकता माजवण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. सरकार पाडण्यासाठी त्यांची ही धडपड सुरु आहे. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्त्व शिकवायला त्यांच्या दारात जात असेल तर त्याची प्रतिक्रिया येणारच, असं वक्तव्य करत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिवसेनेची पाठराखण केली आहे. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्याच्या कारवाईवर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. माझ्यावरील हल्ल्यासाठी ठा...स्पॉन्सर, सोमय्यांचा आरोप
हेही वाचा: माझ्यावरील हल्ल्यासाठी ठाकरे सरकारच स्पॉन्सर, सोमय्यांचा आरोप
ते म्हणाले, राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले होते. तेव्हा पोलिसांनी पाठवलेली नोटीस झिडकारून त्यांनी राज्य सरकारला आव्हान दिलं, त्यामुळे हा तणाव निर्माण झाला. या कारणामुळे राणा पती-पत्नीवर कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. कुणी थेट कुणाच्याही घरात शिरले तर स्वसंरक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. अशावेळी कुणी तुमच्या किंवा माझ्या घरात शिरले तर कारवाई होणारचं, असं म्हणत जयंत पाटील यांनी शिवसेनेचं समर्थन केलं आहे. त्यामुळे भाजपा किती खालच्या स्तरावर राजकारण करतंय याचं चित्र स्पष्ट झालं आहे. काहीही करुन विरोधकांना राज्यातील सत्ता मिळवायची आहे, यासाठी ते प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे ते म्हणाले, सरकार पाडण्यासाठी विरोधकांचे सर्व उपाय करुन झाले आहेत. सगळे उपाय करुन आता ते थकले असल्यानं राष्ट्रपती राजवट लावायची असा प्रयत्नही दिसत आहे. मात्र केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करू नये. महाराष्ट्रात ज्यांच्या पुढाकारानं हे चालु आहे. अन्यथा त्यांच्याविरोधात जनता पेटून उठेल. लोकं त्यांच्या विरोधात बोलत आहेत. लोकांना घरी बसून जे टीव्हीवर दिसतंय त्यातून भाजपविरोधात प्रक्षोभ दिसत आहे. विरोधी पक्षाने काम जागरुकतेनं करावं, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे.
हेही वाचा: 'बाळासाहेबांच्या नावावर रासलीला, मी काही केलं तर....', अमृता फडणवीस यांचे नवं ट्विट
जाणीवपूर्वक राज्यातील वातावरण गरम करणं, जातीय तेढ निर्माण करणं, नको त्या ठिकाणी हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आग्रह धरणं, आंदोलनाचा इशारा देण, म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. कोणीतरी राणां दाम्पत्याला सांगतंय आणि ते तसं करत आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.
Web Title: Jayant Patil Reaction On Rana Couple Police Custody Learn To Hindutva Thackeray Family
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..