सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व सोयी दिल्या पाहिजे या मताचा मी आहे. मला खात्री आहे की, महाविकास आघाडी सरकारमधील आपल्या खात्याशी संबंधित मंत्री तुम्हाला योग्य न्याय देतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिला. आज ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) उपस्थित होते.
त्यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली ते म्हणाले, शिक्षक असा घटक आहे की ज्याला सामान्य माणसाच्या मनातील भावना सर्वात आधी कळतात आणि एक चांगला विचार समाजात रुजविण्याचे कार्यही शिक्षकच करतात. माझी आणि शिक्षकांची नाळ आधीपासूनच जुळलेली आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत याची कल्पना मला आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाला आज उपस्थित राहिलो. विचारमंचावर अनेक दिग्गजांनी आपल्या विचारांची देवाणघेवाण केली असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शरद पवार म्हणाले, मागील २ वर्षात संकटावर संकटे येत आहेत. कोरोना, चक्रीवादळ सारखी संकटे आली. त्यामुळे अधिवेशन देखील होऊ शकले नाही. काही मागण्याही मान्य होऊ शकल्या नाही. मात्र जुनी पेन्शन योजना, शिक्षणाचे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.