Jayant Patil: दूध मांगोगे दूध देंगे, इन्व्हेस्टमेंट मांगोगे..., जयंत पाटलांचं ट्विट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

Jayant Patil: दूध मांगोगे दूध देंगे, इन्व्हेस्टमेंट मांगोगे..., जयंत पाटलांचं ट्विट चर्चेत

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यापासून सरकारवर नवनवे आरोप केले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील अनेक उद्योग परराज्यात गेले त्यामुळे सरकारवर प्रचंड टीका करण्यात आली होती.

मविआ सरकारच्या काळात मंजूर झालेला वेदांत सारखा येवढा मोठा प्रकल्प गुजरात निवडणुकीच्या काळात कोट्यवधींची गुंतवणूक गुजरातला गेली असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान हिवळी आधिवेशनात देखील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला घेरलं होतं.

हेही वाचा: Aurangabad Crime: औरंगाबाद हादरलं! आईच्या सांगण्यावरूण पतीनं केली पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाची हत्या

गुंतवणूक राज्यातून गेल्याने अनेक, बॅनर्स, फोटो आणि मिम्स व्हायरल होत होते आणि आत्ता देखील होत आहेत. मात्र या मिम्सची पोस्ट करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर खोचक टीका केली आहे.

हेही वाचा: Pune crime: पुण्यात चाललंय तरी काय! कोयता गॅंगसोबत, वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रीय

जयंत पाटील यांनी काय ट्विट केलं?

जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये तिन्ही बॅनर्स आहेत आणि त्या तिन्ही बॅनर्सवर वेगवेगळा मजकूर लिहिलेला आहे.

पहिल्या मजकूरमध्ये लिहिलं आहे. दूध मागोंगे दूध देंगे, दुसऱ्यावर खीर मांगोंगे खीर देंगे, आणि तिसऱ्या बॅनरवर लिहिलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, त्यावर लिहिलं आहे. इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी, गुजरात को देंगे, असं ट्विटमध्ये मजकूर आहे.

तर पोस्टच्यावर मजकूर लिहीला आहे फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा!

टॅग्स :Jayant Patilncp chief