स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याबाबत जयंत पाटलांचं विधान; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar jayant patil.jpg

स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याबाबत NCPची भूमिका स्पष्ट; पाटील म्हणाले...

मुंबई - आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. तर पुण्यासह इतर महापालिकांच्या निवडणूका देखील होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार का, यावर जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच काँग्रेसच्या नाना पटोले यांच्या भूमिकेवरही ते बोलले. (Mahavikas Aghadi news in Marathi)

हेही वाचा: जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगाची नोटीस, काय आहे प्रकरण?

आघाडीतील घटक पक्षांशी स्थानिक पातळीवर बोलण्याचे अधिकार जिल्हाअध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर शक्य असेल तिथं आघाडी करण्याचा निर्णय आमचा झाल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. तसेच काँग्रेसचे अशोक चव्हाण आमच्यासोबत आहे. त्यांची भूमिका एकत्रित जाण्याची असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईत आल्यावर त्यांची भूमिकाही सुसुत्र होईल, असंही पाटील यांनी नमूद केलं.

हेही वाचा: मंत्रिपद पुन्हा डावलल्याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, कदाचित...

शिवसेनेने विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. आम्हाला या निवडीवेळी विश्वासात घेतलं नसल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तर आमची नैसर्गिक आघाडी नाही, ही तात्पुरती आघाडी आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान, शिवसेनेत बंडाळी झाल्यापासून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे 'एकला चलो रे'चे धोरण पहायला मिळत. मात्र जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होतील, असं म्हटलं आहे.

Web Title: Jayant Patils Big Statement On Mahavikas Aghadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..