esakal | जिंतेंद्र आव्हाड का म्हणतायेत अण्णा उठायची वेळ झाली?
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad Criticise on Anna Hajare

राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (ता. 21) ज्येष्ठ समाजसेवक यांना ट्विट करून टोला लगावला आहे. अण्णा उठा कामाला लागावे लागेल, रामदेव बाबा तयार आहेत. उठा उठा सत्ता गेली. आंदोलनाची वेळ आली आहे, अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

जिंतेंद्र आव्हाड का म्हणतायेत अण्णा उठायची वेळ झाली?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (ता. 21) ज्येष्ठ समाजसेवक यांना ट्विट करून टोला लगावला आहे. अण्णा उठा कामाला लागावे लागेल, रामदेव बाबा तयार आहेत. उठा उठा सत्ता गेली. आंदोलनाची वेळ आली आहे, अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून आण्णा हजारे हे शांत झाले असल्याची टीका त्यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केले आहे. राज्यात मोठ्या सत्तापेचानंतर शिवसेना, राष्ट्रावादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून सरकार स्थापन होण्याची वेळ आली आहे. अशावेळी जितेंद्र आव्हाड यांनी हे सूचक ट्विट केले आहे. जितेंद्र आव्हाड हे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रिय असणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यातच त्यांनी आज ट्विटरवरून अण्णा हजारे यांना लक्ष केले आहे.

पुण्यातील टॉयलेट होणार 'बेस्ट'; महापालिकेची भन्नाट योजना

पाच वर्षापूर्वी जेव्हा काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात होते. तेव्हा अण्णा हजारे यांची अनेक आंदोलने गाजली होती. जंतर-मंतरवर आण्णांच्या आंदोलनाने देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचे काम केले होते. त्यानंतर काँग्रेस आघाडीचे सरकार पायउतार होऊन भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर मात्र अण्णा हजारे यांनी कोणत्याही प्रकारचे लक्षणीय असे आंदोलन केलेले पाहायला मिळाले नाही. या पार्श्वभूमीवरच जितेंद्र आव्हाड यांनी ही टीका केली आहे.सत्तास्थापनेच्या हालचालीमधील आजच्या घडामोडी; वाचायलाच हव्यात

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आज (ता.21) नवी दिल्ली येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवेसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.