'पत्रकारांना लस द्या'; मित्राच्या निधनानंतर आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Jitendra_Awhad_Uddhav_Thackeray
Jitendra_Awhad_Uddhav_Thackeray
Updated on

मुंबई : राज्यातच नव्हे तर देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घालण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एएनआय वृत्तसंस्थेचे पत्रकार सबाजी मोहन पालकर यांचं कोरोनामुळे मुंबईत निधन झालं. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे खास विनंती केली आहे. 

यासंबंधीचं एक ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले की, 'आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो कि, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती.'

आव्हाड पुढे म्हणाले की, 'पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो, असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे.'

आरोग्य मंत्रालयानं सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत एक लाख ३ हजार ५५८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या २४ तासांत ५३ हजार ८४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४७८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी २५ लाख ८९ हजार ६७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एक कोटी १६ लाख ८२ हजार १३६ जणांनी कोरोनावर मात केली. देशभरात सध्या सात लाख ४१ हजार ३० रुग्ण उपचाराधीन आहेत. तर एक लाख ६५  हजार १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com