राफेल करारात भ्रष्टाचार ते मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना पदावरून हटवणार? वाचा एका क्लिकवर

Breakfast_News
Breakfast_News

फ्रान्समधील वेबसाइट मीडिया पार्टने राफेल पेपर्स नावाने एक लेख प्रकाशित केला आहे. या लेखात राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे पुण्यात ऑक्सिजनच्या मागणीत तिपटीने वाढ झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरून हटवण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

१) लोकलमध्ये उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी कार्यालयांना घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि जीवनावश्यक सेवा देणाऱ्या बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर

२) कमालच झाली बुवा! बिहारमध्ये चक्क विकली वाहती नदी

भागलपूर जिल्हा ऐतिहासिक गुवारीडीह टिला भागात ही गमतीशीर घटना घडली आहे. वाचा सविस्तर

३) Corona Updates: मृत्युदर दुसऱ्या लाटेत कमी; घाबरू नका, काळजी घ्या!

लोकांच्या निष्काळजीपणामुळे २ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्रातील नवीन रुग्णांची संख्या ४४ हजार एवढी होती. असे असले तरी पहिल्या लाटेपासून दुसरी लाट वेगळी आहे. वाचा सविस्तर

४) Pune Corona Updates: पुण्यात ऑक्सिजनची मागणी तिपटीने वाढली

अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. वाचा सविस्तर

५) गृहमंत्रीपदावरुन अनिल देशमुखांना हटवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आग्रही

गृहमंत्री देशमुखांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गृहखाते काढून घेऊन, दुसऱ्या खात्यात त्यांची बदली करावी, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका असल्याचे शिवसेनेतील अंतर्गत सूत्रांनी सांगितले. वाचा सविस्तर

६) मल्याळम अभिनेते पी. बालचंद्रन काळाच्या पडद्याआड

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या रिचर्ड अॅटनबरो यांच्या 'गांधी' या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. वाचा सविस्तर

७) वॅक्सिंग करण्यापूर्वी या चार गोष्टी मनातून टाका काढून

पीरियड्सच्या आधी किंवा पीरिड्सच्या दरम्यान त्वचा अधिक संवेदनशील असते त्यामुळे या कालावतील वॅक्सिंग केले तर वेदना होतात. वाचा सविस्तर

८) ऍडव्हेंचरचा आनंद लुटण्यासाठी नामेरी नॅशनल पार्कला जा

खास गोष्ट म्हणजे आपण पॉकेट फ्रेंडली बजेटमध्ये या ठिकाणी फिरू शकता. या व्यतिरिक्त, जर आपल्याला वन्यजीव छायाचित्रकारात रस असेल तर नक्कीच या जंगलात जायलाच हवं. वाचा सविस्तर

९) 1583 च्या काळातील आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिराविषयी माहितीय?; जाणून घ्या रंजक आणि रहस्यमय कहाणी

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी हे एक छोटसं लहान गाव. इसवी सन 1583 च्या काळातील वीरभद्र मंदिर आणि वीरभद्राला समर्पित असलेले हे प्रसिद्ध मंदिर आहे. वाचा सविस्तर

१०) YouTube वर दिसणार नाही डिसलाईकचे बटण, जाणून घ्या कारण

आता युट्यूबचे लाईक आणि डिसलाईक मेकर्सच्या पेजवर स्पष्ट दिसते. मात्र नवीन फीचरमध्ये फक्त लाईक बटणच दिसणार आहे. वाचा सविस्तर

११) विदेशात नाही तर भारतातच आहे जगातील सर्वात मोठे बेट, वाचा सविस्तर

गेली ५०० वर्षे माजुली ही आसामची सांस्कृतिक राजधानी असून आसामी संस्कृतीचे पाळणाघर आहे. माजुली हे बेट आसामी नव-वैष्णव संस्कृतीचे केंद्र मानले जाते. वाचा सविस्तर

१२) खळबळजनक ! राफेल करारात भ्रष्टाचार, फ्रान्सच्या वेबसाइटचा दावा

फ्रान्समधील वेबसाइट मीडिया पार्टने राफेल पेपर्स नावाने एक लेख प्रकाशित केला आहे. या लेखात राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com