एकनिष्ठेचे फळ मिळालं जितेंद्र आव्हाड यांना, घेतली मंत्रिपदाची शपथ..

सकाळ वृत्तसेवा, मुंबई
Monday, 30 December 2019

राष्ट्रवादी काँग्रेसमधले फायरब्रँड नेते. पक्षातला ओबीसी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. कळवा-मुंब्रा मतदार संघातून ते निवडून येतात. 2002 मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात प्रथम आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यानानातर ते सलग कळवा मुंब्रा मतदार संघातून निवडून येतायत. 

मोठी बातमी: आदित्य ठाकरे, महाविकास आघाडीच्या कॅबिनेटमधील सर्वात तरुण चेहरा !

राष्ट्रवादी काँग्रेसमधले फायरब्रँड नेते. पक्षातला ओबीसी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. कळवा-मुंब्रा मतदार संघातून ते निवडून येतात. 2002 मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात प्रथम आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यानानातर ते सलग कळवा मुंब्रा मतदार संघातून निवडून येतायत. 

मोठी बातमी: आदित्य ठाकरे, महाविकास आघाडीच्या कॅबिनेटमधील सर्वात तरुण चेहरा !

आघाडीच्या काळातही त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. आपल्या वकृत्त्वाच्या जोरावर ते पक्षाची भूमिका ठामपणे मांडतात. सध्याच्या काळात शरद पवारांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. महाविकास आघाडीच्या आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्यावरच होती. शिवाय आमदारांना कर्तव्यदक्षतेची शपथ देण्याची संकल्पानाही आव्हाडांनीच राबवली.

मोठी बातमी: नवाब मलिक, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा जुना जाणता नेता..

शरद पवारांचे अत्यंत निकट वर्तीय म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ओळख आहे. पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते जितेंद्र आव्हाड अनेकदा आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी चर्चेत राहिलेत. 

महाराष्ट्रातील दहीहंडी जगभरात पोहोचवण्यात जितेंद्र आव्हाड यांचा मोठा वाट आहे. जितेंद्र आव्हाड यानी मुंबई विद्यापीठातून मास्टर्स ऑफ लेबर स्टडी याचसोबत मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी देखील मिळवलीये आहे. 

मोठी बातमी: कामगार ट्रेड युनियन ते कॅबिनेट मंत्री, असा राहिला अनिल परब यांचा प्रवास

जितेंद्र आव्हाड यांना शरद हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे नेते आहेत. दरम्यान आज जितेंद्र आव्हाड यांची मंत्रीपदावर वर्णी लागल्यामुळे ठाण्यात 'एकनिष्ठेचे फळ' असं लिहलेले बॅनर्स देखील लावलेले पाहायला मिळालेत. दरम्यान स सर्व घडामोडी पाहण्यासाठी आई हवी होती अशी भावना जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना बोलून दाखवली. 

जितेंद्र आव्हाड यांनी आज महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलीये.  

WebTitle : jitendra awhad took oath as cabinet minister of maharashtra in thackeray ministry

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jitendra awhad took oath as cabinet minister of maharashtra in thackeray ministry