Eknath shinde: के.चंद्रशेखर रावांची ठाण्यात एन्ट्री, CM शिंदेंची डोकेदुखी वाढली?

ठाणे जिल्हातील उल्हासनगर शहरात राव यांचे झळकले बॅनर
Eknath shinde
Eknath shindeEsakal

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात हळूहळू पाय रुजवत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे राज्यातील मोठ्या पक्षांची काळजी वाढु लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून घेणे असा मोठा कार्यक्रमच राव यांनी हाती घेतला असून, त्यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यातही वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

चंद्रशेखर राव यांचा प्रभाव ग्रामीण भागात वाढताना दिसुन येत आहे. ग्रामीण भागाबरोबर आता शहरातही चंद्रशेखर राव यांचे बॅनर लागल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात राव यांचे बॅनर लागल्याचे दिसुन येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे.(Latest Marathi News)

Eknath shinde
Pune: पिस्तुलाचा धाक दाखवून पुण्यातील FC रोडवरील फेमस हॉटेलची जबरदस्तीने घेतला ताबा

काही दिवसांपुर्वी भारत राष्ट्र समितीच्या नागपूरमधील कार्यालयाचे उद्‌घाटन चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने नागपुरात बॅनर, झेंडे, पोस्टर लावण्यात आले होते. नांदेड, सोलापूर, सांगली, संभाजीनगर नंतर नागपूरमध्येही भारत राष्ट्र समितीने पक्ष वाढीवर भर दिला आहे. पक्ष कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपमधील काही नेत्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे.(Latest Marathi News)

Eknath shinde
Shiv Sena : फक्त १८ जण हजर होते अन् बाळासाहेबांनी नारळ फोडला !.. अशी झाली होती शिवसेनेची स्थापना

सांगली, सोलापूर, चंद्रपूरसह विविध भागांमध्ये चंद्रशेखर राव यांचे बॅनर्स दिसु लागले आहेत. ठाणे जिल्हातील उल्हासनगर शहरात राव यांचे बॅनर लागले आहेत. के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात बीआरएस पक्षाकडुन बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात बीआरएस पक्षाचे बॅनर लागले आहेत. उल्हासनगरच्या नेताजी चौकात हे बॅनर लावण्यात आले असून विशेष म्हणजे या बॅनरच्या बाजूलाच शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे बॅनर लागलेत. त्यामुळे आता शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे.(Latest Marathi News)

Eknath shinde
Mahavikas Aghadi: 'इच्छा असेपर्यंतच महाविकास आघाडीत' ठाकरे गटाने वाढवलं मविआचं टेन्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com