K Sankaranarayanan|महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के शंकरनारायणन यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

K Sankaranarayanan

K Sankaranarayanan| महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के शंकरनारायणन यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के शंकरनारायणन (K Sankaranarayanan) यांचे आज रविवारी (ता.२४) केरळमधील पलक्कड येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. शंकरनारायणन हे महाराष्ट्र (Maharashtra), नागालँड आणि झारखंडचे राज्यपाल होते. तसेच त्यांनी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गोवा या राज्यांचे काही काळ राज्यपाल म्हणून काम पाहिले. काँग्रेसचे (Congress Party) ज्येष्ठ नेते असलेले शंकरनारायणन हे चार वेळेस आमदार होते. तसेच त्यांनी केरळचे अर्थ, अबकारी आणि कृषीमंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. (K Sankaranarayanan a former governor of maharashtra no more)

हेही वाचा: दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी १००० कोरोनाबाधित, PM मोदी घेणार बैठक

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करुन महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के शंकरनारायणन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये आम्हाला ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के शंकरनारायणन यांच्या निधनाचे दुःख होत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो !

Web Title: K Sankaranarayanan A Former Governor Of Maharashtra No More

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top