'...क्योंकी वो अपनासा लगता है'; राहुल यांना मिठी मारल्यानंतर विवाहितेची FB पोस्ट व्हायरल

Rahul Gandhi
Rahul Gandhi

बुलडाणा - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देशभर पदयात्रा करत आहे. ही यात्रा नुकतीच महाराष्ट्रात दाखल झाली होती. महाराष्ट्रात या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र यात्रेतील राहुल गांधी यांच्या साधेपणाची, सर्वसामान्यांना भेटण्याचीच चर्चा अधिक होतेय. अगदी तरुण-तरुणी, विवाहित महिला, वृद्ध महिला-पुरुष आणि लहान मुलं राहुल गांधीची गळाभेट घेतात. त्यांना मिठी मारत आहे. यातून राहुल गांधींच्या आश्वसक व्यक्तीमत्व दिसून येतय, असं अनेकांचं मत आहे. अशाच आशयाची एक पोस्ट फेसबुकवर एका महिलेने शेअर केली आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. (rahul gandhi news in Marathi)

Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra: मृत शेतकऱ्यांप्रती शोक व्यक्त करताना आतषबाजी, राहुल गांधी संतापले; म्हणाले...

कल्पना सुर्यवंशी-गेडाम यांची ही पोस्ट आहे. या पोस्टमध्ये कल्पना यांनी राहुल गांधी यांना हजारोंच्या गर्दीत आणि आपले पती सोबत असताना मारलेल्या मिठीविषयी सांगितलं. तसेच राहुल गांधी किती आश्वासक वाटतात, हे सांगितलं. तसेच प्रत्येक पुरुष असा आश्वासक आणि विश्वासक असेल त्या दिवशी या देशातील प्रत्येक स्त्री सुरक्षित असेल, असंही कल्पना यांनी म्हटलं.

कल्पना आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, का मारली असेल मी मिठी त्याला..

मी काही कोणी नवथर तरूणी नाही..ना तो कोणी पंचवीस वर्षाचा शाइन मारणारा तरूण..

पण तरीही एका स्त्री ने, एका आईने ,एका पत्नी ने हजारों लोकांसमोर अशी कोणाला मिठी मारावी.. समाजात एका प्रतिष्ठित व्यक्ती ची बायको म्हणून वावरताना,प्रत्येक लहानसहान गोष्ट करताना लोक काय म्हणतील हा विचार करणाऱ्या स्त्रीने अशी परक्या व्यक्तीला अख्ख्या जगासमोर मिठी का मारली असेल...

मी त्याला भेटल्याचा आनंद माझ्याहून ही जास्त कोणाला झाला असेल तर तो माझ्या मुलीला..ती मुलगी म्हणजे कोणी चार पाच वर्षाची चिमणी नाही , जी फोटोत आई दिसतंय सगळीकडे म्हणून खुश होणारी...ती आता साडे सतरा वर्षाची एक प्रगल्भ आणि ठाम विचार करणारी तरूणी आहे.. एका बारावीत शिकणाऱ्या तरुण मुलीच्या आईने का मारली असेल अशी मिठी त्याला! तेही अगदी नवरा सोबत असताना..

सर्वात आधी तो फोटो मी तिला पाठवला होता... " लहानपणापासून मी ऐकून ऐकून मी थकली होती राहुल गांधी ला भेटायचं आहे चला आता भेटलीस एकदाची तू त्याला " हे तिचं पहिलं वाक्य...

स्त्री ला स्पर्शाची भाषा चांगलीच अवगत असते.. अगदी पुरूषाच्या नजरेतून तिला ते कळते की त्याच्या मनात काय असेल..अशीच नाही ती कोणालाही मिठ्या मारत फिरत..

राहुल ला भेटणं हे माझं स्वप्न होतं तेव्हापासून.. जेव्हा तो कोणीच नव्हता आणि लोकांच्या भाषेत पप्पू होता.. का भेटायचं होतं मला त्याला तर तो नेहमीच मला आपला माणूस वाटला..द्वेष पसरवणाऱ्या या समाजात प्रेम वाटत फिरणारा, प्रेमाची खरी किंमत कळणारा राहुल..

बालवयात आजी नी तरूणपणी वडील गमावणारा तरीही मनात कुठेही राग, द्वेष न ठेवता मारेकऱ्यांना माफ करणारा मोठ्या मनाचा माणूस..

कठीण परिस्थितीत न डगमगता आई, बहिणीला सांभाळणारा खंबीर राहुल..

कसलाही भेद न करता माणसाला माणूस म्हणून वागवणारा प्रेमाचा खळखळता झरा म्हणजे राहुल..

लोकांनी कितीही हिणवून टिकाटिपण्णी केली तरी कुठलाही आक्रस्ताळेपणा न करणारा संस्कारी राहुल..

त्याच्या मृदु बोलण्याने आणि गोड हसण्याने भुरळ पाडणारा राहुल..

त्याच्या डोळ्यात बघताच सारं जग विसरायला लावणारा राहुल..

काही लोकांच्या कपटनीतीचा भाग होऊन जगापुढे हसं झालेला पण तरीही आपला चांगुलपणा न सोडणारा राहुल..

बापाच्या शरीराच्या चिंध्या झालेल्या असतानाही असा बिनधास्त रस्त्यावर उतरायला जिगरा लगता है यारों..

त्याला पप्पू म्हणा किंवा कोणी काहीही म्हटलं तरी तो ठासून खोटं बोलणारा खोटारडा, क्रूर, खुनशी, कपटी नाही हेच माझ्यासाठी खूप आहे..

राहुल गांधी एक जिवंत प्रेमळ,आपलासा वाटणारा एक साधा मनुष्य आहे तुमच्या आमच्या सारखा..आज त्याच्या भोवती एक वलय तयार झालंय.. आज प्रत्येकाला त्याला मिठी मारायची आहे.. अगदी लहानमोठे,स्त्री, पुरुष सगळ्यांना..आहेच तो तसा विश्वासक,आपला वाटणारा.. माझंही तसंच झालं अगदी अनपेक्षितपणे तो मला भेटला.. त्याक्षणी माझी काय अवस्था झाली असेल माझं मलाच माहीत आहे.. मला नाही आठवत मी काय बोलले पण मी त्याला मिठी मारली..

हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

Rahul Gandhi
इंदिराबाई! पक्ष फोडून गट वेगळा काढला अन् त्यालाच खरी काँग्रेस बनवली

तिथे उपस्थित लोक काय विचार करतील, कोणी फोटो घेईल किंवा आणखी कसलाही विचार माझ्या डोक्यात नव्हता.. एक संमोहन अवस्था होती ती.. माझ्या डोळ्यासमोर माझा आवडता राहुल गांधी होता आणि मी होती.. बाकी सारं जग जणू थांबलं होतं त्या क्षणाला.. मला नाही आठवत समोर पोझ देत काढलेला फोटो कधी काढला किंवा मी कधी तशी त्याच्या कमरेत हात घालून पोझ दिली.. अगदी आता पाच दिवसानंतर ही मी ब्लॅंक आहे..पण मी त्याला भेटली, गुलाब दिला,हात धरून चालली,बोलली,मिठी मारली.. हे सत्य आहे!!

तो आनंद, उत्साह आणि आपुलकीचा क्षण आयुष्यभरासाठी कायम माझ्या मनात कोरल्या गेलाय!

प्रत्येक पुरुष असा आश्वासक आणि विश्वासक असेल त्या दिवशी या देशातील प्रत्येक स्त्री सुरक्षित असेल!!

❤️ क्योंकी वो अपनासा लगता हैं ❤️

Rahul Is Love ❤️

Love you Rahul 🤗🥰

#RahulGandhi#

कल्पना सुर्यवंशी गेडाम

ब्रम्हपुरी 😊🙏

एकंदरीतच राहुल यांच्यात सहृदय व्यक्तीमत्व समोर यायला सुरू झालं आहे. याशिवाय राहुल गांधी यांचे अबाल-वृद्धांसोबतचे अनेक फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com