Indira Gandhi
Indira Gandhi

इंदिराबाई! पक्ष फोडून गट वेगळा काढला अन् त्यालाच खरी काँग्रेस बनवली

- स्नेहल माने

नव्वदच्या दशकातल्या हिन्दी चित्रपटांमध्ये शेवटच्या सीनमध्ये हाणामारी ठरलेली असायची. या हाणामारीत हिरोने दोन चार ठोसे लगावले की व्हिलन खाली कोसळायचा, डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजायचा…पोलीस हाणामारीच्या ठिकाणी दाखल व्हायचे. हिरोहिरॉइन एकमेकांच्या गळ्यात पडायचे आणि थेटरात द एंडची पाटी झळकायची. पण नंतरच्या काळात जे 'पिक्चर अभि बाकी है मेरे दोस्तो' अशी जी हूल उठलीय ती चित्रपट सोडून सगळीकडंच कायम झालीय. आता तुम्ही म्हणाल बेहनजी केहना क्या चाहती हो ? तर मायबाप प्रेक्षकहो आम्ही बोलतोय एकनाधड ssss... ओहो (कपाळावर हात) आम्ही बोलतोय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात सुरु असलेल्या रोजच्या ह्यलागाड त्यालागाड स्पर्धेबद्दल. ही स्पर्धा सुरूच राहील, भविष्यात याचे किस्से बनतील की बघा बघा शिंदे गट कसा फुटला होता, आमुक तमुक... या सिनेमाची द एन्डची पाटी अजून काही पडली नाही. मात्र ही पाटी पडायच्या आत एक किस्सा सांगायला पाहिजे आपल्या इंदिरा बाईंचा. ( Indiara Gandhi news in Marathi)

Indira Gandhi
Baramati : बारामती पर्यटन केंद्र विकसीत होण्यासाठी प्रयत्नशील - अजित पवार

या बाई ७० च्या दशकात सेम आपल्या एकनाथ शिंदेंसारखं वागल्या होत्या. या बाईंनी काँग्रेस फोडून आपला आपला गट बाजूला काढला आणि सवता सुभा थाटला. आज इंदिरा बाई ह्यात नाहीत मात्र शो मस्ट गो ऑन म्हणत आपण बाईंची गोष्ट बघू.

तर गोष्ट सुरु होते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान बनतात. त्यांची लाडकी इंदू तोपर्यंत तरी राजकारणात नसल्यातच जमा. मध्ये मध्ये ती राजकीय कार्यक्रमात हजेरी लावायची, पण ती सुद्धा नावापुरतीच. हां मात्र पडद्यामागून सूत्र हलवायची सवय तिला याच काळात लागली. पुढे नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. नेहरूंच्या इंदूला सत्तेत सहभागी करून तेवढीच आपली जनमानसातली प्रतिमा दयाळू भासवण्याचं काम राज्यकर्ते करतात. पुढं होत असं की, ताशकंदाला गेल्यावर शास्त्रीजींचा मृत्यू होतो. आता मूळ गोष्ट सुरु होते. थोडं कान देऊन ऐका

हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर काँग्रेसमधली कारभारी मंडळी झाडून कामाला लागतात. कारण त्यांना नवा संसदीय नेता अर्थात पंतप्रधान हवा असतो. इकडं मोरारजी भाई पंतप्रधान होण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधून तयार असतात. त्यांना थांबवायचं तर नेहरूंच्या इंदूला पुढं करा असा सूर काँग्रेसचे जेष्ठ वरिष्ठ असलेले कामराज आळवतात. मग काय अक्खी काँग्रेस इंदूला पाठिंबा देते. काँग्रेसच्या संसदीय नेतेपदासाठी नेहरूंची इंदू विरुद्ध मोरारजी भाई अशी थेट लढत होते. आणि या लढतीत इंदू ३५५ मतांनी विजयी होऊन पंतप्रधान होते.

Indira Gandhi
"काळ्या टोपीखाली सडका मेंदू" राष्ट्रवादीच्या आमदाराची राज्यपाल कोश्यारींवर जहरी टीका

आता इंटरव्हल झालाय फर्स्ट हाफ काँग्रेशी नेत्यांना मानवलाय.

पण सेकण्ड हाल्फमध्ये नेहरूंच्या इंदूची इंदिरा गांधी बनते. ही गुंगी गुडिया आता शेलक बोलायला शिकते. याच दरम्यान १४ बँकांच राष्ट्रीयीकरण असो, राजेमहाराजांचे तनखे बंद करणं असो.. असे धडाडीचे निर्णय ती घेते. हळूहळू जनतेला पण ही नवी इंदिरा आवडायला लागते. पण पक्षातल्या कारभारी मंडळींना आता तिचा उपद्रव वाटायला लागतो. तिला पंतप्रधानपदावरून खाली कसं खेचायचं यासाठी वेगवेगळ्या शकला लढवल्या जात असतात. अशातच कारभारी मंडळींना आशेचा किरण दिसतो. १९6९ मध्ये राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचं निधन होत. हि आयती संधी आहे म्हणत कामराज आणि इतर कारभारी मंडळी नीलम संजीव रेड्डी यांचं नाव पुढं करतात. इंदिरेला मात्र व्ही. व्ही गिरी यांना राष्ट्रपती करायचं असतं. काँग्रेसमधूनच दोन उमेदवार उभे राहतात. एक अधिकृत आणि दुसरे इंदिरेचे. दोघांमध्ये काटे की टक्कर होते. काँग्रेसचे बहुतांश खासदार आणि आमदार इंदिरा गांधींनी उभ्या केलेल्या उमेदवाराला आपलं बहुमूल्य मत देतात आणि व्ही. व्ही गिरी निवडून येतात.

Indira Gandhi
Vinayak Mete: विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षात फुट?

या सगळ्या रामायणात काँग्रेसची कारभारी मंडळी इंदिरा गांधींवर खार खातात आणि इंदिरा गांधींचं काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याच्या कामाला लागतात. तो दिवस होता १ नोव्हेम्बर १९6९ चा काँग्रेसची दोन शकलं झाली होती. या दिवशी काँग्रेस कार्यकारिणीच्या दोन स्वतंत्र बैठका झाल्या. एक पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींच्या निवासस्थानी आणि एक काँग्रेसच्या मुख्यालयात. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे याच मुख्यलयात इंदिरा गांधींचं काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आलं.

आपणचं खरी काँग्रेस हा दावा दोन्ही बाजुंनी ठोकण्यात आला. उभी रात जागून प्रत्येक खासदार आपल्याला पाठिंबा देईल म्हणून दोन्ही बाजूनी प्रयत्न झाले. राज्यसभा आणि लोकसभा असे मिळून काँग्रेसचे ४२९ खासदार होते यातल्या ३१० खासदारांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. इंदिरा गट इंडिकेट तर कामराज आणि इतर काँग्रेशी कारभारी मंडळी सिंडिकेट म्हणून ओळखली जाऊ लागली. बाईंनी शंभर वर्षांचा जुना पक्ष झटक्यात फोडला होता. जसा आज शिंदेनी फोडलाय. तेव्हाचे सिंडिकेट गटाचे अर्थात ऑफिशियल काँग्रेस गटाचे अध्यक्ष असलेले निजीलिंगप्पा शेवटचे ऑफिशियल अध्यक्ष ठरले. नंतर इंदिरा बाईंचा गटचं काँग्रेस म्हणून ओळखला जाऊ लागला.

Indira Gandhi
Nana Patole : भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसचा 'प्लॅन रेडी'; राहुल गांधी महाराष्ट्रात...

या सगळ्या प्रकरणात ताक हि गेलं तूपही गेलं हाती धुपाटणे राहील अशी अवस्था झालेले कामराज म्हणले होते.. ए बिग मॅन्स डॉटर ऍड ए लिटिल मॅन्स मिस्टेक! आणि असं म्हणत खरी काँग्रेस कोणती या प्रकरणावर पडदा पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com